Uttarakhand Car Accident Saam Tv
देश विदेश

भयंकर घटना! नदीपात्रात कार कोसळली; ९ जणांचा बुडून मृत्यू

आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारस ही घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

रामनगर : जुलै महिना सुरू होताच देशात पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात नदीपात्रात कार कोसळून अपघात झाला आहे. या दुर्देवी घटनेत कारमधील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रामनगर येथील ढेला नदीपात्रात ही दुर्देवी घटना घडली. (Uttarakhand Latest Marathi News)

यामध्ये एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. नदीत बुडालेल्या कारमधून शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व 9 मृतदेह बाहेर काढता आले. अपघातग्रस्त कारही तासाभराच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली. सर्व मृत पंजाबमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

ढेला नदीच्या परिसरात रात्री उशिरा 2 वाजेपासून पाऊस पडत होता. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले होते. त्याचवेळी काशीपूरहून रामनगरला जाताना नदीचा प्रवाह पाहून थांबलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने पुलावरून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कारचालकाला पूल पार न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याचा सल्ला न ऐकता कारचालकाने कार थेट पुराच्या पाण्यात टाकली.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार थेट पूलावरून वाहून जात नदीत कोसळली. या कारमध्ये एकूण 10 जण होते, त्यापैकी एक मुलगी बचावली आहे. डीआयजी नीलेश आनंद भरणे यांनी घटना आणि बचावकार्याला दुजोरा दिला. सर्व मृत पंजाबमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक लोकांनीही कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT