Bhupendra Patel CM Oath Ceremony : गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विक्रमी विजयानंतर नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सोमवारी (12 डिसेंबर) दुपारी 2 वाजता गांधीनगर येथील हेलिपॅड मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाच्या पूर्व रात्री पक्षाने निश्चित केलेल्या नावांसह आमदारांना कळवण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी निश्चित आमदारांना बोलावून उद्या शपथ घ्यायची असल्याचे सांगितले. आतापर्यंत ज्या आमदारांना फोन करून शपथ घेण्याची माहिती मिळाली आहे, त्यात एकूण 17 नावांचा समावेश आहे.
त्यामुळे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात या आमदारांना मंत्री केले जाणार असल्याचे मानले जात आहे. भाजपकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वतीने शपथ घेणार्या आमदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
संभाव्य मंत्र्यांची यादी
1. घाटलोडिया आमदार - भूपेंद्र पटेल
2. मजुरा आमदार - हर्ष संघवी
3. विसनगर आमदार - ऋषिकेश पटेल
4. पारडी आमदार - कनुभाई देसाई
5. जसदणचे आमदार - कुंवरजीभाई बावलिया
6. खंभलियाचे आमदार - मुलुभाई बेरा
7. जामनगर ग्रामीणचे आमदार - राघवजी पटेल
8. भावनगर ग्रामीण आमदार - पुरुषोत्तम भाई सोलंकी
9. सिद्धपूर आमदार - बलवंत सिंह राजपूत
10. राजकोट ग्रामीण आमदार - भानुबेन बाबरिया
11. संतरामपूर आमदार - कुबेर भाई दिंडोर
12. देवगड बारिया आमदार - बच्चू खबर
13. निकोल आमदार - जगदीश पंचाल
14 . ओलपाडचे आमदार- मुकेश पटेल
15. मोडासाचे आमदार- भिखुभाई परमार
16. कामरेजचे आमदार- प्रफुल्ल पानसेरिया
17. मांडवीचे आमदार- कुंवरजी हलपती
मंत्रिमंडळात तरुण, महिला आणि अनुभवी चेहऱ्यांना स्थान
भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत गुजरातच्या मंत्रिमंडळावर चर्चा झाली. त्यानंतरच मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. सुमारे 20-22 चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, त्यापैकी 9 कॅबिनेट आणि उर्वरितांना राज्यमंत्री बनवले जाऊ शकते. नव्या मंत्रिमंडळात तरुण, महिला आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश करून नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.