Bhopal Rape Saam Tv
देश विदेश

Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, ड्रग्ज देऊन बलात्कार, टोळीनं तरूणींचे प्रायव्हेट VIDEO शेअर करत..

Gang Accused of physically Exploiting Hindu Girls: टीआयटी कॉलेजमध्ये एका टोळीने हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Bhagyashree Kamble

भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीआयटी कॉलेजमध्ये एका टोळीनं हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच प्रायव्हेट व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत ८ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी २०२३ पासून तरूणींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीच्या मुख्य आरोपीचे नाव फरहान असे आहे. तो २०२३ पासून एका पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होता. फरहानची टोळी आधी तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ड्रग्ज देऊन शरीरसंबंध ठेवत असे. नंतर व्हिडिओ शूट करत व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिने आपल्या तक्रारीत म्हटलं की, फरहान नावाच्या व्यक्तीने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले, नंतर त्याच्या मित्राच्या हमीदच्या घरी नेले आणि तिथे बलात्कार केला. बलात्कार करातानाचा व्हिडिओ शूट करून शेअर करण्याची धमकी दिली. नंतर याच व्हिडिओच्या माध्यामातून नराधम तरूणींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे.

भोपाळचे पोलीस आयुक्त एचसी मिश्रा म्हणाले, आतापर्यंत फरहानच्या टोळीच्या जाळ्यात अनेक हिंदू तरूणी फसल्या आहेत. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर गुन्हा नोंदवून रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. या प्रकरणी फरहान आणि मोहम्मद या २ संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

SCROLL FOR NEXT