यापुढे आता रस्ते अपघातात धडक देऊन अपघातानंतर पळून जाणे चांगलेच महागात पडणार आहे. भारतीय कायद्यांमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावांमध्ये रस्ते अपघातांबाबतच्या तरतुदींचाही समावेश आहे. ज्यामध्ये यापुढे हिट ॲन्ड रन प्रकरणात आता 10 वर्षांची शिक्षा होणार आहे.. अशी माहिती केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली.
रस्ते अपघातानंतर पळून गेल्यास १० वर्षांची शिक्षा..
रस्ते अपघातानंतर (Road Accident) पळून जाणाऱ्या लोकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Sarkar) कडक कायदा केला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. या नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पळून गेल्यास अथवा जखमींना रस्त्यावर सोडल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होणार आहे.
या नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार वाहन चालकाला अपघात झाल्याचे पोलिसांना कळवावे लागेल, अन्यथा पकडल्यानंतर 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. यामध्ये काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. ज्यानुसार अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जर जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास मदत केली, तर त्याची शिक्षा कमी होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बुधवारी लोकसभेत या नव्या कायद्याची माहिती दिली आहे.
यापूर्वी आयपीसीच्या कलम 104 अंतर्गत, रस्ते अपघातात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यानंतर 2 वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होती. ज्यामध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र आता सुधारित नवीन कायदा लोकसभेने मंजूर केला आहे आणि आता तो राज्यसभेत सादर केला जाईल, त्यानंतर राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर तो कायदा होईल. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.