BJP Issues 3 Line Whip Saam Tv
देश विदेश

BJP Issues 3 Line Whip: सरकारविरुद्ध अविस्ताव प्रस्तावावर ३ दिवस चर्चा, भाजप खासदारांना ५ दिवसांसाठी ३ ओळींचा व्हीप

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

Delhi News:

भाजपने (BJP) आपल्या लोकसभा खासदारांना (Loksabha MP) तीन ओळींचा व्हिप (Three Line Whip) जारी केला आहे. भाजपने आपल्या खासदारांना ५ दिवसांचा हा व्हिप जारी केला आहे. या कालावधीमध्ये सभागृहात उपस्थित राहण्यासाठी, सरकारच्या भूमिकेला आणि विधेयकांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर केल्यानंतर भाजपने ते राज्यसभेत मंजूर करण्याकडे फोकस केला आहे. विरोधी पक्षाच्या 'इंडिया' अघाडीने मणिपूर मुद्यावरून सरकारविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे त्यावर लोकसभेत चर्चा होणार आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ही चर्चा होणार आहे.

10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. त्यासाठी भाजपकडून 7 ऑगस्ट ते अधिवेशन संपेपर्यंत म्हणजेच 11 ऑगस्ट पर्यंत तीन ओळींचा व्हीप सर्व खासदारांसाठी जारी करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षांकडून चर्चेदरम्यान गोंधळ घातला जाऊ शकतो. चर्चेवेळी सत्ताधारी बाकावर आपल्या खासदारांचे संख्याबळ पुरेपूर असावं यासाठी भाजपने सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठीच हा व्हीप जारी करण्यात आलेला आहे.

दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याचोसबत त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे अनेकदा संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 ऑगस्ट रोजी या मुद्द्यावर बोलणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

SCROLL FOR NEXT