bharat jodo yatra: jammu and kashmir gave me love, not hand grenades- rahul gandhi saam tv
देश विदेश

Bharat Jodo Yatra : 'जम्मू कश्मीरने मला हँड ग्रेनेड नाही, प्रेम दिले', राहुल गांधींचं समाप्तीचं भाषण

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी श्रीनगरमध्ये समारोप झाला. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जोरदार बर्फवृष्टीत राहुल गांधींनी भाषण केले.

Chandrakant Jagtap

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी श्रीनगरमध्ये समारोप झाला आहे. काँग्रेसने या यात्रेच्या समारोपावेळी श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जाहीर सभा बोलावली. यावेळी राहुल गांधी समारोपाचे भाषण करताना म्हणाले की, तुम्हाला जगायचे असेल तर न घाबरता जगावे लागेल हे मी गांधीजींकडून शिकलो आहे. मी चार दिवस इथे पायी फिरलो. माझ्या टी-शर्टचा रंग बदलून लाल होईल असे म्हटले गेले. पण मला जे वाटले तेच झाले. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही तर प्रेम आणि आपलेपण दिले, प्रेमाने माझे स्वागत केले.

राहुल गांधी म्हणाले, माझ्या आधी प्रियांका गांधी मंचावर आल्या होत्या. त्या जे बोलल्या ते ऐकूण माझ्या डोळ्यात पाणी आले. प्रियांका गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, काश्मीरला पोहोचण्यापूर्वी राहुल गांधींनी मला आणि सोनिया गांधींना फोन करून सांगितले होते की, त्यांना विचित्र वाटत आहे. त्यांना त्यांच्या घरी आल्यासारखे वाटत आहे. जेव्हा ते काश्मीरमधील लोकांना भेटतात तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू असतात.

काश्मिरियत म्हणजे काय? - राहुल गांधी

राहुल म्हणाले, मी लहानपणापासून सरकारी घरात राहिलो आहे, माझ्याकडे घर कधीच नव्हते. माझ्यासाठी घर म्हणजे वास्तू नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. यालाच तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी त्याला घर मानतो. ते म्हणाले, काश्मिरियत म्हणजे नेमक काय आहे? एकीकडे ही शिवजींची विचारसरणी आहे, आणखी खोलात गेलो तर त्याला शून्यता म्हणता येईल. स्वतःवर, तुमच्या अहंकारावर, तुमच्या विचारांवर आक्रमण करणे. दुसरीकडे इस्लाममध्ये याला फना म्हणतात. विचार एकच आहे. इस्लाममध्येही फना म्हणजे स्वतःवर आक्रमण, तुमच्या विचारावर आक्रमण. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. यालाच आपण काश्मिरियत म्हणतो.

मला हिंसेची वेदना माहित आहे - राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले जे लोक हिंसा घडवतात, त्यांना त्याचं दुःख कळत नाही, मला त्या वेदना माहित आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना समजू शकत नाही, मी समजू शकतो असे राहुल गांधी यांनी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले मी शाळेत होतो तेव्हा आजीला गोळी लागल्याचे काळाले, अमेरिकेत होतो तेव्हा एक फोन आला आणि सांगण्यात आले की वडिलांची हत्या करण्यात आली आहे. असे फोन कॉल्स कोणत्याही जवानाच्या घरी जाऊ नये.

माझ्यावर हल्ला करणाऱ्यांकडून मी शिकतोअसे राहुल गांधी म्हणाले. मी त्यांचे आभार मानतो. मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, देशाचे विभाजन करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. पण द्वेषाने नाही तर प्रेमाने उभे रहा. आपण त्या विचारधारेचा केवळ पराभव करणार नाही, त्यांच्या हृदयातून द्वेषपूर्ण विचारधारा काढून टाकू.

रोज 8-10 किलोमीटर धावतो- राहुल

राहुल गांधी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी रोज 8 ते 10 किलोमीटर धावतो. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणे इतके अवघड जाणार नाही असे वाटले. थोडा अहंकार आला होता. ते पुढे म्हणाले, माझ्या लहानपणी फुटबॉलदरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कन्याकुमारीहून प्रवास सुरू झाला तेव्हा गुडघ्यात वेदना होत होत्या, पण नंतर काश्मीरमध्ये येईपर्यंत ही वेदना दूर झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT