Bharat Jodo Yatra Farewell: भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप, जोरदार बर्फवृष्टीत राहुल गांधींचं भाषण

Srinagar: राहुल गांधी यांनी यात्रेत ४ हजार किमीहून अधिक लांबीची पदयात्रा केली. पाच महिने चाललेली ही यात्रा 12 राज्यांमधून गेली.
Rahul Gandhi's speech in heavy snowfall
Rahul Gandhi's speech in heavy snowfallSAAM TV
Published On

Bharat Jodo Yatra Ends: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगरपर्यंत सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी समारोप झाला आहे. शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील चेश्मा साही येथे यात्रेच्या शिबिराच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावला. राहुल गांधी यांनी यात्रेत ४ हजार किमीहून अधिक लांबीची पदयात्रा केली. पाच महिने चाललेली ही यात्रा 12 राज्यांमधून गेली.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही श्रीनगरमधील पक्षाच्या मुख्यालयात तिरंगा फडकवला. या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे स्मारकही उभारण्यात आले आहे. शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झालेल्या यात्रेच्या समारोप सभेसाठी पक्षाने २१ राजकीय पक्षांना निमंत्रण दिले होते. या सभेतून विरोधी एकजुटीची प्रदर्शन करत यात्रेचा समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी जोरदार बर्फवृष्टी होत असताना आपले भाषण पूर्ण केले.

Rahul Gandhi's speech in heavy snowfall
Adani Group News: 'राष्ट्रवादाआड फसवणूक झाकली जाऊ शकत नाही', अदानींच्या स्पष्टीकरणानंतर हिंडेनबर्गची प्रतिक्रिया

भाजप, आरएसएसवर राहुल गांधींची टिका

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काश्मीरमध्ये मला पदयात्रा करण्याऐवजी गाडीतून प्रवास करण्यास सांगण्यात आले होते. माझे पांढरे शर्ट लाल होईल असे वाटले होते. मी द्वेषाला संधी देण्याचे ठरवले आणि पदयात्रा पूर्ण केली. अखेर प्रेमाचाच विजय झाला आणि माझ्या शर्टचा रंग लाल झाला नाही. यावेळी बोलताना राहुल गांधींनी भाजपसह आरएसएसवर देखील निशाणा साधला. मी हिंसा पाहिली आहे, त्यामुळे मी हिंसेला भीत नाही. मी शाळेत असताना आजीला गोळी मारल्याची माहिती मिळाली होती. माझ्या कुटूंबाने हिंसा पाहिली आहे. मोदी आणि शाह यांनी ती पाहिली नाही. आरएसएसनेही हिंसा पाहिली नाही असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi's speech in heavy snowfall
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस; सुरक्षेचं कारण देत या पक्षांनी फिरवली पाठ

4080 किमी चालली 'भारत जोडो यात्रा'

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी 30 जानेवारी रोजी समाप्त झाली आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून 145 दिवसांत सुमारे 4080 किलोमीटरचे अंतर कापून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. या ठिकाणी रविवारी ऐतिहासिक लाल चौकात जाऊन राहुल गांधींनी तिरंगा फडकावला आणि देशाला दिलेले वचन पूर्ण झाल्याचे सांगितले. हा प्रवास आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असल्याचे वर्णन राहुल गांधींनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com