अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरलेत. देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळतोय. एकीकडे राममंदिर उद्घाटनाचा उत्साह असतानाच आसाममध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे.
खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये सुरू आहे. आसाम सरकारचा या यात्रेला विरोध असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून वारंवार केला जात आहे. अशातच आज राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखल्याने मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
आज (२२, जानेवारी) राहुल गांधी आसाममधील नागावमधील वैष्णव विद्वान श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी प्रार्थना करणार होते. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. ज्यानंतर राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी मंदिरासमोर आंदोलन सुरू केले. तसेच हे सर्व आसाम सरकारच्या दबावामुळे होत असल्याचा आरोपही कॉंग्रेसने (Congress) केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याबाबत बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'काँग्रेसच्या दोन आमदारांनी मंदिर व्यवस्थापनाकडून वेळ काढली होती, मंदिर व्यवस्थापकांनाही काही अडचण नव्हती, पण आता हे सर्व राज्य सरकारच्या दबावामुळे केले जात असल्याचा आरोप केला. तसेच राहुल गांधी यांनीही देशात फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्यास परवानगी आहे, अशी टीकाही पंतप्रधान मोदींवर केली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.