बेंगळुरूमध्ये ओला इलेक्ट्रिक्सच्या इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सुसाइड नोटमध्ये भावेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठांवर मानसिक शोषणाचा आरोप करण्यात आलाय.
या घटनेने कॉर्पोरेट क्षेत्र आणि आयटी वर्तुळात खळबळ
ओला इलेक्ट्रिक्समधील एका ३८ वर्षीय इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने २८ पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्याने कंपनीचे मालक भावेश अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. ज्या ज्या लोकांची नावे सुसाईड नोटमध्ये आहे, त्या सर्वांनी मानसीकरित्या शोषण केल्याचा आरोप इंजिनिअरनं केलाय. मृत व्यक्तीचे नाव के. अरविंद आहे. दरम्यान या घटनेनेमुळे खळबळ माजली आहे.
या घटनेनंतर ओला कंपनीनेने प्रतिक्रिया दिलीय. के.अरविंद यांनी कधीही तक्रार केली नव्हती किंवा त्याच्या समस्या कोणाशीही शेअर केल्या नव्हत्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, के अरविंद हे होमोलोगेशन इंजिनिअर होते. ते २०२२ पासून ओलामध्ये काम करत होते. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अरविंद हा बेंगळुरूमधील चिक्कलसांद्रा येथील रहिवासी होता. त्याने ज्यावेळी विष प्राशन केलं त्यावेळी त्याच्या मित्राने महाराजा अग्रसेन रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान अरविंद यांचा मृत्यू झाला.
अरविंदच्या मृत्यूनंतर त्याच्या भावाला २८ पानांची सुसाईड नोट सापडली. यात त्याने सुब्रत कुमार दास आणि भावेश अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्याचा आणि मानसिक छळ करण्याचा आरोप केला होता. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, कंपनीत अरविंदचा छळ करण्यात आला आणि त्याला पगारही नाकारण्यात आला होता.
अरविंदच्या भावाच्या म्हणण्यानुसार अरविंदच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याच्या खात्यात १७,४६,३१३ ट्रान्सफर करण्यात आले. जेव्हा अरविंदचा भाऊ पैशांबद्दल विचारण्यासाठी ओला कंपनीशी संपर्क साधला तेव्हा सुब्रतने स्पष्ट उत्तर दिलं नाही. अरविंदच्या भावाने ६ ऑक्टोबर रोजी ओलाचे मालक भावेश अग्रवाल आणि इतर काही जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
ओला कंपनीनेही अरविंद यांच्या निधनाबद्दल स्पष्टीकरण देणारे निवेदन जारी केलंय. कंपनीने म्हटले आहे की, "आमचे कर्मचारी अरविंद यांच्या निधनाने आम्हाला खूप धक्का बसलाय. या कठीण काळात आमच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत." अरविंद गेल्या साडेतीन वर्षांपासून कंपनीत होते. ते बेंगळुरू येथील मुख्यालयात कार्यरत होते.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत त्यांची ओळख नव्हती. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या गुन्हाविरुद्धात कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.