Bengaluru Couple Death News: ईशान्य बेंगळुरूमधील चिक्काजाला येथे एक विवाहित जोडप्याचा घरातील गीझरमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रशेखर एम (30) आणि पत्नी सुधाराणी अशी या दोघांची नावे असून दोघेही त्यांच्या घराच्या बाथरूममध्ये कार्बन मोनोऑक्साइडच्या धुरामुळे गुदमरून मृतावस्थेत आढळले. हा मृत्यू 10 जूनच्या रात्री झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून हे प्रकार सोमवारी उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर एम (30) आणि त्यांची पत्नी सुधराणी (22) हे 10 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तारबनहल्ली येथील त्यांच्या घरी आले. रात्री 9.10 च्या सुमारास हे दाम्पत्य गॅस गिझर चालू करून आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. बाथरुमचे दार आणि खिडकी बंद होती, त्यामुळे हवेला आत जायला जागा नव्हती. ज्यामुळे दोघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
दोघांचाही मृत्यू...
हा संपूर्ण प्रकार सोमवारी सकाळी शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यानंतर लक्षात आला. त्यांच्या घरातून कुठलाही आवाज येत नव्हता. काही हालचाल नव्हती, त्यामुळे घर मालकाचा संशय बळावला. त्यानंतर घर मालकाने याबद्दल पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. पोलिसांनी आत प्रवेश करताच त्यावेळी एम चंद्रशेखर आणि यू सुधारानी मृतावस्थेत आढळले.
पोलिसांचे आवाहन..
प्राथमिक पोलिस तपासात विषारी वायू, शक्यतो कार्बन मोनॉक्साईडमुळे श्वासोच्छवास झाल्याचा उल्लेख आहे. गिझरमधून कार्बन मोनॉक्साईड सोडल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने या जोडप्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, तसेच गॅस गीझर बसवताना हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करा, असं पोलिसांनी आवाहन केले आहे.
अशी घ्या काळजी...
गिझर लावताना आणि ते बंद करण्याची जबाबदारी घरातील प्रत्येक व्यक्तीची आहे. प्रत्येक गिझरमध्ये ठरावीक वेळेनंतर पाणी तापतं. अशावेळी बादलीत आवश्यक पाणी मिळालं की गिझर बंद करा. हल्ली ऑटोमेटिक गिझर आले असून पाणी तापल्यानंतर आपोआप बंद होतात. मात्र जुन्या गिझरमध्ये अशी सोय नाही. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.