Husband Mahendra Reddy Texted Women After Killing Wife Saam
देश विदेश

'तुझ्यासाठी बायकोची हत्या' डॉक्टर पत्नीच्या मृत्यूनंतर नवऱ्याचा कारनामा, अनेक मुलींना लग्नासाठी प्रोपोजल अन्..

Husband Mahendra Reddy Texted Women After Killing Wife: बंगळुरूतील डॉक्टर महेंद्र रेड्डी यांनी पत्नीची भूल देऊन हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर रेड्डीनं लग्नासाठी अनेक महिलांना मेसेज करून लग्नाचा प्रस्ताव दिला होता.

Bhagyashree Kamble

बंगळुरूमध्ये डॉक्टर कृतिका एम. रेड्डी यांच्या हत्येचा आरोप असलेल्या डॉक्टर महेंद्र रेड्डी जी.एस यांच्याप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतर रेड्डी यांनी काही महिलांशी संपर्क साधला. तसेच त्यांना लग्नासाठी प्रस्ताव दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी एका महिलेसमोर पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं. डॉ. कृतिका यांच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये शरीरात भूलीचं औषध असल्याचं आढळून आलं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रेड्डीनं किमान चार ते पाच महिलांना मेसेज पाठवले होते. त्यापैकी मेडिकल प्रोफेशन असलेल्या महिलेला रेड्डीनं मेसेज टाकला. पोलिसांनी सांगितले की, रेड्डीने तिला एक मेसेज केला. 'तुमच्यासाठी मी माझ्या पत्नीची हत्या केली', असं त्याने लिहिलं. यानंतर त्या महिलेनं रड्डीला ब्लॉक केलं. त्यानंतर रेड्डीनं त्या महिलेला फोन पेवर मेसेज पाठवला.

पोलिसांनी सांगितले की, रेड्डी यांनी २४ एप्रिल रोजी भूल देऊन कृतिकाची हत्या केली. नंतर १४ ऑक्टोबर रोजी उडुपी जिल्ह्यात त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी तपास करून मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. तपासादरम्यान, त्यानं महिलांना पाठवलेले मेसेज उघड झाले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, बिझनेसमॅन मुनी रेड्डी यांनी त्यांचे जावई डॉ. महेंद्र रेड्डी जीएसच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर महेंद्र रेड्डीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत त्यांनी आपल्या मुलीची हत्या जावयाने केली असल्याचा आरोप केला. महेंद्रने लग्नानंतर कृतिकाला त्रास देण्यास सुरूवात केली. महेंद्रने कृतिकाच्या कुटुंबावर रूग्णालयाच्या बांधकामासाठी पैसे देण्यासाठी दबाव टाकला होता. नंतर महेंद्रनेच कृतिकाची चुकीचे औषध देऊन हत्या केली, असा आरोप कृतिकाच्या वडिलांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT