Bengaluru crime  Saam tv
देश विदेश

Crime: सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून बायकोची हत्या, भररस्त्यात धाडधाड गोळ्या झाडल्या

Bengaluru Crime: बंगळुरूमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. सॉफ्टवेअर इंजिनीअरने गोळ्या झाडून बायकोची हत्या केली. भररस्त्यात हा रक्तरंजित थरार रंगला. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये एकच खळबळ उडाली.

Priya More

Summary:

  • बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने बायकोची हत्या केली

  • चारित्र्याच्या संशयावरून त्याने हे भयंकर कृत्य केले

  • कामावरून घरी जाताना त्याने बायकोला रस्त्यात अडवले आणि तिची हत्या केली

  • आरोपीने बायकोवर चार गोळ्या झाडल्या यातच तिचा मृत्यू झाला

बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरने गोळ्या झाडून बायकोची हत्या केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी इंजिनिअरने पोलिस ठाण्यात जाऊन सरेंडर केले. चारित्र्याच्या संशयावरून त्याने बायकोची हत्या केली. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंगळुरूतील मगाडी रोडवर घडली. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्याची बायको बँकेत असिस्टंट मॅनेजर होती. दोघांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यामुळे त्याची बायको वेगळी राहत होती. तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने बायकोची गोळ्या झाडून हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, भुवनेश्वरी (३९ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. ती बसवेश्वरनगर येथील यूनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये असिस्टंट मॅनेजर होती. ती ७ वाजता कामावरून घरी जात होती. तेव्हा आरोपी बालामुरूगनने तिला रस्त्यात अडवले. आरोपीने सोबत आणलेल्या बंदुकीतून तिच्यावर गोळीबार केला. त्याने बायकोवर चार गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ शानबाग रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोपीचे २०११ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. नात्यात दुरावा आल्यापासून दोघेही गेल्या १८ महिन्यांपासून वेगळे राहत होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्यापासून दूर राहण्यासाठी, भुवनेश्वरी सहा महिन्यांपूर्वी व्हाईटफील्डहून राजाजीनगरला राहायला गेली. त्यानंतर बालमुरुगन तिचा पाठलाग करू लागला. चार महिन्यांपूर्वी तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तो केपी अग्रहारा पोलिस हद्दीतील चोलुरपाल्या येथे राहायला गेला. एका आठवड्यापूर्वी त्याने भुवनेश्वरीला घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीस पाठवली.

आरोपी पूर्वी एका खासगी आयटी फर्ममध्ये काम करत होता. पण गेल्या चार वर्षांपासून तो बेरोजगार होता. आरोपी आणि त्याची बायको दोघेही तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बायकोची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर बालमुरुगन मगडी रोड पोलिस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आणि बंदुक दिली. पोलिसांनी बीएनएस कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT