Bengaluru Crime news Saam Tv News
देश विदेश

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Bengaluru Crime news: बंगळूरूमध्ये सातवीतील विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. डेथ नोट वेब सिरीजच्या प्रभावाचा संशय. मोबाईल जप्त, पोलिसांची चौकशी सुरू.

Bhagyashree Kamble

  • बंगळूरूमध्ये सातवीतील विद्यार्थ्यानं आत्महत्या केली

  • डेथ नोट वेब सिरीजच्या प्रभावाचा संशय

  • मोबाईल जप्त, पोलिसांची चौकशी सुरू

  • पालकांच्या माहितीनुसार मुलाला कोणतीही वैयक्तिक समस्या नव्हती

सातवीतल्या विद्यार्थ्यानं वेब सिरीज पाहून आयुष्य संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जपानी वेब सिरीज डेथ नोट पाहून त्यानं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ वर्षीय चिमुकला त्या वेब सिरीजचा मोठा चाहता होता. त्यानं त्याच्या खोलीत डेथ नोट मालिकेतील पात्रांचे फोटो लावले होते. त्यामुळे पोलिसांना या वेब सिरीजमुळे चिमुकल्यानं आयुष्य संपवलं असल्याचा संशय आहे.

ही धक्कादायक घटना बंगळूरूतील अच्छुकट्टू परिसरात घडली आहे. मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सातवीतल्या मुलाला शाळा किंवा घरी कोणतीही समस्या नव्हती. पोलिसांनी मुलाचा मोबाईल फोन जप्त केला आहे.

सध्या पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. त्यांचा मुलगा डेथ बुक या मालिकेचा फॅन होता. डेथ बुक ही एक वेब सिरीज ज्यात शालेय विद्यार्थ्याला एक रहस्यमयी नोटबुक सापडते. या नोटबुकचं नाव डेथ नोट असे आहे.

या नोट बुकमध्ये ज्याचे कुणाचे नाव लिहिले असेल, त्याचा मृत्यू होतो. या स्टोरीमध्ये विद्यार्थी नोटबुकचा वापर त्या लोकांना मारण्यासाठी करतो, जे चुकीचं काम करतात, किंवा तो विद्यार्थी चुकीचे मानतो. जेणेकरून तो गुन्हेगारीमुक्त जग निर्माण करू शकेल.

या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

SCROLL FOR NEXT