Kolkata Doctor Death Case Protest:  Saamtv
देश विदेश

Nabanna Abhiyaan Rally: अत्याचाराच्या घटनेनंतर बंगालमध्ये आंदोलन पेटलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; पाहा VIDEO

Kolkata Doctor Death Case Protest: आंदोलकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र निदर्शन केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून शहरात 6,000 हून अधिक कोलकाता पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Gangappa Pujari

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि हावडामध्ये डॉक्टरांनी आंदोलन पुकारले असून नवब्बा अभियान मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात आंदोलन

पश्चिम बंगालच्या आरजी का हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारी कोलकाता आणि हावडा येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘नबान्ना अभियान’ पदयात्रा सुरू केली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला असून त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या तसेच पाण्याचा माराही केला आहे.

परिसरात कडक बंदोबस्त

या हत्या आणि अत्याचाराच्या घटनेविरोधात का विद्यार्थी संघटनेने हावडा स्थित सचिवालय नबन्ना येथे निषेध मोर्चा काढण्याची योजना आखली आहे. हावडा येथील संत्रागाछी येथे आंदोलक जमा होत आहेत. आंदोलकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र निदर्शन केली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून शहरात 6,000 हून अधिक कोलकाता पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच आंदोलकांच्या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी हावडा ब्रीज पादचाऱ्यांसाठी बंद केला आहे.

पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा

कोलकाता पोलीस आणि हावडा शहर पोलिसांनी नबन्नाच्या आजूबाजूचा परिसरात १९ ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, तर इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाच ॲल्युमिनियम बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलिसांव्यतिरिक्त कॉम्बॅट फोर्स, हेवी रेडिओ फ्लाइंग स्क्वॉड (एचआरएफएस), रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ), क्विक रिॲक्शन टीम (क्यूआरटी) आणि वॉटर कॅनन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT