उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन विनोद जिरे
देश विदेश

उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन

बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणाचे कनेक्शन बीडपर्यंत येऊन पोहचले आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड : मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील UP बेकायदेशीर धर्मांतरण Conversion of Religion प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता या प्रकरणाचे कनेक्शन बीडपर्यंत Beed येऊन पोहचले आहे. कारण या प्रकरणातील एक आरोपी बीड येथील रहिवासी आहे. तो केंद्र शासनाच्या Central Government महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी असल्याचे समोर येत आहे. Beed connection of illegal conversion of Religion case in Uttar Pradesh

मुकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण, उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी Police या प्रकरणाचा तपास गतीने सुरू केला. मागच्या काही दिवसांपुर्वीच या प्रकरणात केंद्रीय मंत्रालयात Union Ministry काम करणार्‍या एका अधिकार्‍यालाही गजाआड केले होते. आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट बीडपर्यंत येऊन पोहचल्याचे समोर येत आहे.

हे देखील पहा-

काल सोमवारी ता. २८ रोजी या प्रकरणात पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. यामध्ये गुरगाव उत्तर प्रदेश येथून मन्नू यादव तसेच दिल्ली येथील राहुल भोला आणि बीड येथील इरफान शेख या तिघांचा समावेश आहे. इरफान शेख हा केंद्रीय मंत्रालयात महिला व बालकल्याण विभागातील Department of Women and Child Welfare कर्मचारी असल्याचे समोर येत आहे.

बीडच्या इरफान शेखचे युपीत धर्मांतर कनेक्शन:

पोलिसांनी ताब्यात घेतलेला इरफान शेख हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी Parali तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणचा आहे. तो सध्या दिल्ली या ठिकाणी वास्तव्यास आहे. तो दिल्ली या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो.

मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएसन ATS ताब्यात घेतलेलं आहे. सिरसाळा येथे त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत Delhi वास्तव्यास आहे. असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे अहमदाबाद Ahmedabad येथील आयोजीत विद्यालयात कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी इरफानचे उत्कृष्ट कार्याबद्दल व्यासपिठावर कौतूक देखील केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

अवैध धर्मांतरण प्रकरणांमध्ये इरफानचं नाव आल्यामुळे त्याच्या परिवाराला धक्का बसला आहे. इरफान असे करू शकत नाही. असे त्याच्या मामाने सांगितले आहे. मात्र त्याच्या परिवाराने आणखी माहिती देण्यास नकार दिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

SCROLL FOR NEXT