किळसवाना प्रकार : दोन दलितांना मारहाण करत चाटायला लावली स्वत:ची थुंकी (पहा Video) @jigneshmevani80/SaamTV
देश विदेश

किळसवाना प्रकार : दोन दलितांना मारहाण करत चाटायला लावली स्वत:ची थुंकी (पहा Video)

निवडणुकीमध्ये आपणाला मत दिले नाही या रागातून 2 दलित मतदारांवरती अमानवी अत्याचार करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबई : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घडलेला एक किळसवाना प्रकार समोर आला आहे. निवडणुकीमध्ये आपणाला मत दिले नाही या रागातून 2 दलित मतदारांवरती अमानवी अत्याचार करण्यात आले आहेत. याबाबतचा गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी (MLA Jignesh Mevani) यांनी ट्विट Tweet केला आहे.

पहा व्हिडीओ -

त्या व्हिडीओ Video मध्ये एक व्यक्ती दोन दलितांना उठा-बशा काढायला लावतोय उठा-बशा काढून ते दोघे थकल्यावरती त्यांना चक्क जमीनीवरती थुंकायला लावून नंतर तीच थुंकी त्यांना चाटायला लावण्याचा किळसवाना प्रकार समोर आला आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने पराभवानंतर हा किळसवाना प्रकार केल्याचा आरोप या ट्विटद्वारे मेवानी यांनी केला आहे.

दरम्यान तो व्हायरल व्हिडिओ (Viral Video) शेअर करत मेवानी यांनी संताप व्यक्त केला आहे. या दलितांना मारहाण केली, उठाबशा काढायला लावून थुंकी चाटायला लावली या असल्या श्रेष्ठत्वाच्या विकृत भावना आपण कधी बाजूला ठेवणार आहोत? असा प्रश्न मेवानी यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT