BCCI Loses Blue Tick Saam Tv
देश विदेश

BCCI Loses Blue Tick: PM मोदींच्या‌ आवाहनानंतर BCCI ने डीपी बदलला; ट्विटरने ब्ल्यू टिक काढली

Satish Kengar

BCCI Loses Blue Tick: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर डीपी बदलणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) महागात पडलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'हर घर तिरंगा मोहिमे'च्या समर्थनार्थ डिस्प्ले पिक्चर (Indian Flag DP) बदलण्याचे आवाहन केलं होतं.

यानंतर बीसीसीआयने ट्विटरवर आपला डीपी बदलला होता. बीसीसीआयने डीपी बदलल्यानंतर ट्विटरने त्यांच्या अकाऊंटवरून ब्लू टिक हटवलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट दिनी देशभरात 77 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी नागरिकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल पिक्चर भारतीय तिरंग्यानुसार बदलण्याचे आवाहन केले. यातच बीसीसीआयने पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांचा डीपी बदलला. (Latest Marathi News)

यामुळे बीसीसीआयला आपली ब्लू टिक गमवावी लागली. ब्लू टिक गेल्यानंतर काही लोक विचार करू लागले की, बीसीसीआयचे अधिकृत अकाउंट व्हेरिफाय का नाही आहे. काही लोकांनी सांगितले की, ट्विटर त्या अकाउंटचे ब्लू टिक काढून टाकते जे त्यांचे डीपी बदलतात.

दरम्यान, भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व राखत नऊ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. दुसरीकडे आज लॉडरहिलमधील सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर पाचवा आणि अंतिम टी-20 सामना खेळवला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT