Maharashtra Karnataka Dispute Saam TV
देश विदेश

Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं थेट अमित शहांना आव्हान?; महाराष्ट्राला डिवचत म्हणाले..,

महाराष्ट्राच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असं ट्विट बोम्मई यांनी केलं आहे.

Satish Daud

Maharashtra Karnataka Dispute : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमावाद उफाळून आला आहे. या वादावर लवकरात लवकर तोडगा काढा अशी मागणी महाराष्ट्रातील नेत्यांकडून केली जात आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीच्या काही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर अमित शहा यांनी सीमाप्रश्न लवकरच सोडवल्या जाईल असं आश्वासन मविआ खासदारांना दिलं. यावरून आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

महाराष्ट्राच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असं ट्विट बोम्मई यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखीच तापण्याची शक्यता आहे.

बसवराज बोम्मई काय म्हणाले?

'महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शहांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही', असं ट्विट बोम्मई यांनी केलं आहे. बोम्मई यांचं हे ट्विट थेट अमित शहा यांना चँलेंज आहे का? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

बोम्मईंकडून सातत्याने सीमावादावर वक्तव्य

एकीकडे महाराष्ट्रातील नेते दोन्ही राज्यांतील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्राला मधस्थी करण्याची विनंती करत आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्राला डिवचण्याचं काम करत आहेत. यापूर्वी देखील बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटक सरकारचा दावा असल्याचं विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले होते. आता पुन्हा एकदा बोम्मई यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचण्याचं काम केलं आहे.

अमित शाह यांचं चर्चेचं आश्वासन

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) खासदारांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सीमाभागांतील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा त्यांनी शहांसमोर मांडला. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी या खासदारांनी केली. गुजरातमध्ये १२ डिसेंबर रोजी नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यानंतर दोन दिवसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दिल्लीत चर्चा करू, असे आश्वासन शाह यांनी दिले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT