BIHAR MAN ELOPES WITH SISTER-IN-LAW AND NEXT DAY BROTHER-IN-LAW WITH HIS SISTER IN UTTAR PRADESH 
देश विदेश

Shocking : अजब लव्ह स्टोरी! नवरा मेहुणीच्या प्रेमात पडला, मेहुणा भावजीच्या बहिणीसोबत गेला पळून

Bareilly Crime News: बरेलीतील नवाबगंजमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले. एक तरुण पत्नी सोडून मेहुण्यासोबत पळाला, त्यावर मेहुणा बहिणीसोबत निघाला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले, नंतर कुटुंबांनी समजुतीने प्रकरण मिटवले.

Dhanshri Shintre

  • उत्तर प्रदेशातील कमलुपूर गावात अनोखे प्रेमप्रकरण उघड.

  • तरुण आपल्या मेहुणीसोबत पळून गेला, तर दुसऱ्या दिवशी मेहुणा बहिणीसोबत पळाला.

  • पत्नीने पोलिसात धाव घेतली, पोलिसांनी दोन्ही जोडपी शोधून काढली.

  • परस्पर संमतीने प्रकरण मिटवल्याने गावात चर्चा रंगली.

"प्रेम आणि संकट कधीच इशारा देऊन येत नाहीत," ही म्हण खरी ठरवणारी एक आगळीवेगळी घटना उत्तर प्रदेशातील कमलुपूर गावात घडली आहे. सहा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या एका तरुणाने आपल्या पत्नीला सोडून मेहुणीसोबत पळ काढला. आश्चर्य म्हणजे, दुसऱ्याच दिवशी त्या तरुणाचा मेहुणाही त्याच्या बहिणीसोबत पळून गेला. या अनोख्या प्रेमकहाणीने संपूर्ण गावात चर्चांना उधाण आले आहे.

देवरानिया पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेनंतर कुटुंबात गोंधळ माजला. पत्नीला जेव्हा नवऱ्याच्या पराक्रमाची माहिती मिळाली तेव्हा ती संतप्त झाली. तिने सर्वप्रथम घरातील वडीलधाऱ्यांना याबाबत सांगितले, परंतु काहीही मार्ग न निघाल्याने अखेरीस तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस तत्काळ हालचाल करून दोन्ही प्रेमीयुगलांना शोधून काढले आणि दोनही मुलींना परत आणण्यात यश मिळवले.

मात्र पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर अखेर परिस्थितीने वेगळाच वळण घेतले. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आणि वातावरण तापण्याऐवजी शेवटी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारण्यात आला. या प्रकरणात दोन्ही घरातील लोकांनी चर्चा करून परस्पर संमतीने निर्णय घेतला.

कोतवाल अरुण कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबांनी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही आणि आपापसात समझोता करून प्रकरण मिटवले आहे. या अनोख्या गुंतागुंतीच्या प्रकरणाने गावात चांगलीच खळबळ उडवली असून लोकांमध्ये या घटनेची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Deshpande : देशपांडे बहिणींची पहिली पडद्यावरील जोडी, गौतमीची गीतकार म्हणून नवी भूमिका

Shocking : धक्कादायक! पुण्यातील जोडप्याकडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण; ५ दिवसांनी चिमुकला सापडला पंजाबमधील वृद्धश्रमात

Maharashtra Live News Update: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ रंगाचा अर्थ काय?

Banana Benefits: महिनाभर केळी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT