केंद्रीय अर्थ मंत्रालयाची मोठी शिफारस; बँक भरती परीक्षा आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये Saam Tv
देश विदेश

केंद्रीय अर्थ मंत्रालयाची मोठी शिफारस; बँक भरती परीक्षा आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये

अर्थ मंत्रालयाची शिफारस

विहंग ठाकूर

वृत्तसंस्था : केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने शिफारस केली आहे. की 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी लिपिक भरती आणि जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संदर्भात प्राथमिक आणि मुख्य दोन्ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक संवर्गांसाठी परीक्षा आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीची शिफारस आहे.

हे देखील पहा-

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक, प्रादेशिक भाषांद्वारे ग्राहकांशी अधिकाधिक संवाद प्रस्थापित व्हावे. या उद्देशाने समितीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यातील संवादातील अंतर कमी होण्याची शक्यता कमी होईल. यामध्ये मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगु अशा १३ प्रादेशिक भाषांमध्ये ही बँकांची परीक्षा होणार आहे.

यामध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बड़ौदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब एंड सिंध बँक, यूको बँक या बँकेचा समावेश आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यात कम्युनिकेशन गॅपची शक्यता कमी होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेत धडक; आंदोलनाचा इशारा

Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

Pune : पुण्यात तंत्रज्ञानाची नवी क्रांती! पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये १६ हायटेक प्रयोगशाळा सुरू

White Forest Cake Recipe: घरच्या घरी बनवा बेकरीसारखी चव स्वादिष्ट व्हाईट फॉरेस्ट केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT