Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

Surabhi Jayashree Jagdish

जांभई

सतत जांभई येणं हे फक्त थकवा किंवा झोपेअभावामुळेच होत नाही तर काही वेळा शरीरातील व्हिटॅमीनची कमतरताही त्यामागे कारणीभूत असते.

व्हिटॅमिन्सची कमतरता

काही व्हिटॅमिन्स कमी पडल्यास शरीराची ऊर्जा कमी होते, मेंदूला योग्य सिग्नल मिळत नाहीत आणि त्यामुळे जास्त जांभई येऊ लागते.

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

B12 कमी झाल्यावर शरीराची ऊर्जा कमी होते. मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने वारंवार जांभई येते. यामुळे दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवते.

व्हिटॅमिन D ची कमतरता

व्हिटॅमिन D कमी असल्यास स्नायूंमध्ये थकवा आणि मेंदूवर भार जाणवू शकतो. शरीराला ऊर्जा राखणे कठीण जाते आणि झोप येऊ लागते. यामुळे वारंवार जांभई येते

लोहाची कमतरता

लोह कमी झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. अशावेळी शरीर थकलेलं असल्यास सतत जांभई येते.

मॅग्नेशियमची कमतरता

मॅग्नेशियम कमी असल्यास स्नायूंना योग्य विश्रांती मिळत नाही. यामुळे शरीरावर ताण वाढतो आणि ऊर्जा कमी होते. यामुळे दिवसभर सुस्ती येऊन जांभई येते.

व्हिटॅमिन C ची कमतरता

व्हिटॅमिन C ऊर्जा देण्यास मदत करतं. त्यामुळे त्याची कमतरता सुस्ती निर्माण करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि शरीर थकून जांभई येऊ लागते.

सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

येथे क्लिक करा