Bank holidays in June 2022, Bank holidays in June 2022 Maharashtra  Saam Tv
देश विदेश

Bank Holidays June 2022 : जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; संपूर्ण यादी बघा!

रिझर्व्ह बँकेने देशातील सरकारी बँकांच्या सुट्ट्यांची नवी यादीही प्रसिद्ध केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: जून महिना सुरू होताच, अनेक नियम, बदल लागू झालेले आहेत. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सरकारी बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holiday) नवी यादीही प्रसिद्ध केली आहे. जून महिन्यात (June) यावेळी एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांमध्ये काही कामानिमित्त जाणार असाल तर, सुट्ट्यांची यादी तपासून बघावीच लागेल. (Bank holidays in June 2022)

आरबीआयकडून प्रसिद्ध केलेल्या नव्या यादीनुसार, जूनमध्ये सहा साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणजेच, शनिवार- रविवार आणि इतर सहा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या केवळ सरकारी बँकाच नाहीत, तर खासगी, विदेशी, सहकारी आणि प्रादेशिक बँकांनाही लागू असतील. आरबीआय दरवर्षी तीन प्रकारांमध्ये बँकांच्या सुट्ट्या निश्चित करते. त्यात हॉलिडे अंडर द निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अॅक्ट, रिअलटाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट यांसारख्या प्रकारांमध्ये या सुट्ट्या निश्चित केल्या जातात.

प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्ट्या

आरबीआयकडून जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांतील सर्व बँकांना सारख्याच प्रमाणात लागू होते. मात्र, काही सुट्ट्या विशेषतः एक किंवा एकपेक्षा अधिक राज्यांमध्येच लागू होतात. याच नियमाने या महिन्यातील अनेक सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू न होता काही राज्यांतच लागू होतील. यावेळी अनेक राज्यांत विशिष्ट दिवशी सुट्ट्या असतील. अशावेळी ते राज्य वगळता इतर राज्यांत बँका सुरू राहतील.

जूनमध्ये एकूण चार रविवार आणि दोन शनिवारी सुट्ट्या असतील. कारण दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतील. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशा एकूण सहा दिवस सुट्ट्या मिळतील. ५ जून रोजी रविवार, ११ जूनला दुसरा शनिवार, १२ जून रोजी रविवार, १९ जूनला पुन्हा रविवार, २५ जून रोजी चौथा शनिवार आणि २६ जूनला पुन्हा रविवार अशी सार्वजनिक सुट्टी असेल.

इतर सहा दिवसही बँका राहणार बंद

२ जून रोजी महाराणा प्रताप जयंती आणि तेलंगणा स्थापना दिवस आहे. हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान आणि तेलंगणात बँका या दिवशी बंद राहतील.

३ जून रोजी श्री गुरू अर्जुन देव यांचा शहीद दिवस आहे. या दिवशी फक्त पंजाबमध्ये बँका बंद राहतील.

१४ जून रोजी संत गुरू कबीर यांची जयंती आहे. यानिमित्त हिमाचल प्रदेश, चंदीगड, हरयाणा, पंजाब आणि ओडिशात सुट्टी राहील.

१५ जून रोजी राजा संक्रांती आणि गुरू हरगोविंदजी यांचा जन्मदिन. यानिमित्त ओडिशा, मिझोराम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील.

२२ जून रोजी खारची पूजानिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.

३० जून रोजी फक्त मिझोराममध्ये बँकांना सुट्टी राहील.

Edited By - Nandkumar joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

SCROLL FOR NEXT