BANGLADESH PRESIDENT MOHAMMAD SHAHABUDDIN MAY RESIGN BEFORE TERM ENDS saam tv
देश विदेश

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

President Shahabuddin Likely to Step Down: बांगलादेशात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा देऊ शकतात.

Bharat Jadhav

  • राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या संभाव्य राजीनाम्याची चर्चा

  • कार्यकाळ संपण्यापूर्वी सुमारे दोन वर्षे आधीच ते पद सोडू शकतात

  • माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चर्चांना अधिक वेग

बांगलादेशातील सत्तेचे समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. अलीकडेच माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी चर्चा केली आहे. राजकीय सूत्रांनी आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात लवकरच पुन्हा एकदा सत्तांतर होऊ शकते.

राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच साधारण दोन वर्षे आधीच राजीनामा देणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन हे आपल्या पदावर कायम राहणे सरकारला आता सोयीचे वाटत नाहीये. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सत्ताधारी 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'च्या (बीएनपी) एका वरिष्ठ नेत्याने पीटीआयला सांगितलं की, "शहाबुद्दीन आपल्या पदाचा लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती शहाबुद्दीन आपल्या पदाचा राजीनामा का देणार आहेत?

गेल्या दोन दिवसांपासून शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती बदलण्याचा विचार करत असल्याचे वृत्त अनेक बांगलादेशी प्रसारमाध्यमांकडून देण्यात येत आहे.

जुलै-ऑगस्ट २०२४ मधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर अवामी लीगच्या मागील सरकारमध्ये महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या व्यक्तींपैकी एक असलेले शहाबुद्दीन आपल्या पदावर कायम आहेत. शेख हसीना या ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात आल्या आणि तेव्हापासून त्या तिथेच आहेत.

शहाबुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याशी चर्चा

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'प्रथम आलो' (Prothom Alo) या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार शहाबुद्दीन यांनी काही दिवसापूर्वीच शेख हसीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे देशातील सरकार नाराज होते. 'द डेली स्टार' या वृत्तपत्राशी बोलताना बीएनपीच्या (BNP) एका वरिष्ठ नेत्यानेही सांगितले की, शहाबुद्दीन आणि हसीना यांच्यातील अलीकडील दूरध्वनीवरील संभाषण हे त्यांच्या संभाव्य राजीनाम्याचे एकमेव कारण नाहीये. ज्यावेळी शेख हसीना यांनी देशात परतण्याची घोषणा केली होती, त्यानंतर बांगलादेशातील राजकीय वातावरण अधिकच संवेदनशील बनलं होतं.

शेख हसिना डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतणार

या महिन्याच्या सुरुवातीला हसिना यांनी त्या डिसेंबरमध्ये बांगलादेशला परततील, असं जाहीर केलंय. बांगलादेश सरकारने त्यांच्या परतण्याच्या निर्णयाचे "स्वागत" केले, परंतु त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी सांगितलंय.

१७ नोव्हेंबर २०२५ रोजी, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) 'जुलै उठाव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निदर्शनांचे दमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल हसीना आणि त्यांचे माजी गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल यांना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT