Sheikh Hasina has left Bangladesh Saam Tv
देश विदेश

Bangladesh Crisis: शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात काय होणार? सैन्य देश चालवणार, काय म्हणाले लष्करप्रमुख?

Sheikh Hasina has left Bangladesh: पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. त्या देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशात सत्तापालट होणार आहे का, सत्ता लष्कराच्या हाती येणार का? अशा अनेक शक्यात आणि प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

Satish Kengar

Bangladesh Army Chief on Running Country: बांगलादेशमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. त्या देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशात सत्तापालट होणार आहे का, सत्ता लष्कराच्या हाती येणार का? अशा अनेक शक्यात आणि प्रश्न आता निर्माण झाले आहेत. यातच लष्कर अंतरिम सरकार स्थापन करण्याविषयी बोलत आहे. याआधी बांगलादेशच्या इतिहासात असं घडलं आहे, जेव्हा लष्कराने सत्ता आपल्या हाती घेतली आहे.

बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले?

बांगलादेशात सुरु असलेल्या घडामोडींदरम्यान लष्करप्रमुख वाकर उझ जमान म्हणाले आहेत की, ''शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार आम्ही स्थापन करू. आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ आणि देशात सरकार स्थापन करू. देश चालवणे गरजेचं आहे.''

ते म्हणाले, ''आमच्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवावा, कुठलाही हिंसाचार करू नका. आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू आणि शांतता पुन्हा प्रस्थापित करू. तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आम्ही घेत आहोत.'' वाकर उझ जमान म्हणाले की, ''मी लष्कर आणि पोलिसांना तात्काळ गोळीबार थांबवण्याचे आदेश देत आहे. कोणतीही आणीबाणी नाही किंवा कर्फ्यू नाही. आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे.''

बांगलादेशातील सत्तापालटांचा इतिहास

दरम्यान, बांगलादेशातील सत्तापालटांचा इतिहास खूप जुना आहे. 1971 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेशात लोकशाही मार्गाने निवडणून आलेले सरकार फक्त पाच वर्षेच चालू शकले. त्यानंतर 1975 मध्ये सत्तापालट होऊन लष्कराने देशाची सत्ता काबीज केली. त्यानंतर 1990 पर्यंत बांगलादेश लष्कराने तेथील सरकार चालवले.

2009 मध्येही शेख हसीना सत्तेवर येण्यापूर्वी देशात लष्कर समर्थित काळजीवाहू सरकार कार्यरत होते. अशा परिस्थितीत बांगलादेशचे लष्कर आणि तेथील सरकार यांच्यात अतिशय जवळचे संबंध पाहायला मिळतात. सरकारने स्वतंत्रपणे काम केले पाहिजे, असे बांगलादेशी लष्कराचे मत असले, तरी जेव्हा जेव्हा देशात अस्थिरता निर्माण झाली तेव्हा लष्कराने सक्रिय भूमिका बजावून सत्तेत सहभाग तर दाखवलाच पण अनेकांवर सरकार स्थापन करण्यातही मदत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT