Bangladesh PM Sheikh Hasina Saam Tv
देश विदेश

Bangladesh Clashes: शेख हसीनांचा राजीनामा, बांगलादेश सोडून भारतात; बॉर्डरवर BSF अलर्ट

Bangladesh PM Sheikh Hasina Resigns: बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे.

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

बांगलादेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देत बांगलादेश सोडला असून त्या भारतामध्ये दाखल झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून त्या भारतामध्ये आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले आहेत. शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे म्हटले जात होते. पण आता त्या भारतामध्ये आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला. त्यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडला आहे. त्यांचे हेलिकॉप्टर भारताकडे रवाना झाले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आरक्षणावरून महिनाभर सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर बांगलादेशमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला.

बांगलादेशमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लष्कराच्या टँक देशाच्या मोठ्या भागात फिरत आहेत. आंदोलक पंतप्रधान कार्यालयात घुसले आहेत. असे देखील सांगितले जात आहे की, लष्करानेच शेख हसीना यांचा राजीनामा मागितला होता. लष्करप्रमुखांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. लष्करप्रमुख काही वेळाने देशाला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, आंदोलकांनी 'लाँग मार्च टू ढाका'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर बांगलादेश सरकारने सोमवारी इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले. याच्या एक दिवस आधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये देशाच्या विविध भागात झालेल्या संघर्षात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशमध्ये गेल्या महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनातील मृतांची संख्या ३०० हून अधिक झाली. हिंसक चकमकीनंतर देशाच्या अनेक भागात लष्कर तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT