Thick smoke engulfs Dhaka’s Hazrat Shahjalal International Airport after massive fire; all flights suspended temporarily. saam tv
देश विदेश

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Bangladesh Airport fire: बांगलादेशच्या ढाकामधील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागल्याची घटना घडलीय. सर्व टर्मिनलवर दाट धुराचे लोट पसरले आहे. यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणांने तात्पुरते थांबवण्यात आली आहेत.

Bharat Jadhav

  • ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागल्याची घटना घडलीय.

  • आगीमुळे संपूर्ण परिसर धुराच्या काळोखात गेला.

  • सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागली आहे. आगी इतकी भयानक आहे की, दूरपर्यंत धुरांचे लोट दिसत होते. दुपारी २:१५ वाजता आग लागलीय. त्यानंतर अग्निशमन दल आणि हवाई दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालाय. यात धुराच्या काळोखात संपूर्ण विमानतळ गुडूप झालंय.

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी दुपारी भीषण आग लागली, त्यानंतर तिथून येणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. या प्रकरणात विमान बांगलादेश एअरलाइन्सचे प्रवक्ते कौसर महमूद म्हणाले की, आग लागताच विमानतळ अग्निशमन दल, हवाई दलाचे अग्निशमन दल आणि इतर एजन्सींच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी गाठलं. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नसल्याची माहिती प्रवक्ते कौसर महमूद म्हणाले. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सनुसार, बांगलादेश नागरी विमान वाहतूक प्राधिकरण, अग्निशमन सेवा आणि बांगलादेश हवाई दलाच्या दोन अग्निशमन युनिट्सच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणली जातेय. प्रोथोमालो या माध्यम वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी नौदलाकडूनही प्रयत्न केले जात आहेत.

सध्य सर्व लँडिंग आणि टेकऑफ स्थगित करण्यात आले आहेत आणि अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान विमानतळावर इतकी भीषण आग लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाहीये. कार्गो व्हिलेज आणि शाहजलाल विमानतळ पोस्ट ऑफिसच्या दरम्यान असलेल्या इम्पोर्ट कार्गो कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये सर्वप्रथन आग लागली होती. ही इमारत विमानतळाच्या गेट क्रमांक ८ च्या शेजारी आहे. या गेटला हँगर गेट म्हणतात. कार्गो व्हिलेजला १२ दरवाजे आहेत. तर इम्पोर्ट कार्गो कॉम्प्लेक्सला तीन दरवाजे आहेत. ही आग कॉम्प्लेक्सच्या उत्तरेकडील बाजूला, गेट क्रमांक ३ च्या शेजारी लागली आहे. आग आता संपूर्ण इमारतीत पसरलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT