Smoky Paan  
देश विदेश

Bangalore News: पान खाण्याचा मोह जिवावर बेतला; 'स्मोकी पान' खाल्ल्याने १२ वर्षाच्या मुलीच्या पोटात झालं छिद्र

Smoky Paan : बेंगळुरूमधील अनन्या नावाच्या मुलीने स्मोकी पान खाल्ल्याने तिच्या पोटात छिद्र पडल्याची घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेंगळुरू: हौस मजेसाठी अनेकजण पान खात असतात, पण मजेसाठी आणि स्वाद घेण्यासाठी पान खाणं एका मुलीच्या अंगाशी आलंय. तु्म्ही पानातील स्मोकी पान खाण्याचे शौकीन असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आह. कारण स्मोकी पान खाल्ल्याने एक १२ वर्षाच्या मुलीच्या पोटात छिद्र झाल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडलीय.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बेंगळुरूमधील अनन्या नावाच्या मुलीला (नाव बदलण्यात आले आहे) स्मोकी पान खाल्ल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी अचानक पोटदुखी सुरू झाली. त्यानंतर लगेचच त्याचे कुटुंबीय तिला रुग्णालयात घेऊन गेले, तेथे डॉक्टरांनी तिच्या पोटात छिद्र असल्याचे सांगितले. यानंतर अनन्याला सांगितलं की, तिने फक्त स्मोकी पान खाल्लं. इतर लोकांनीही ते पान खाल्लं पण त्यांना कोणताच त्रास झाला नसल्याचं तिने सांगितले.

दरम्यान रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एचएसआर लेआउटवर असलेल्या नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अनन्याला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. अनन्याला इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीसह एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी करावी लागली. ऑपरेशन सर्जन डॉ विजय एचएस म्हणाले, “इंट्रा-ऑप ओजीडोस्कोपी ही एक अशी प्रक्रिया आहे, यात शस्त्रक्रियेत पोटाची तपासणी करण्यासाठी लवचिक ट्यूब वापरली जाते.

या ट्यूबने अन्ननलिका तपासली जाते. यातून डॉक्टरांना समजलं की, अनन्याच्या पोटाच्या ४बाय ५ सेंटिमीटरचा एक भाग काढून टाकण्यात आला. दरम्यान शस्त्रक्रियेनंतर ६ दिवसांनी अनन्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नारायण रुग्णालयानुसार,नायट्रोजन गॅसच्या बंद जागेत जलद बाष्पीभवनामुळे खूप दबाव निर्माण होत असतो. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. तसेच स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. "द्रव नायट्रोजनचा धूर शरिरात घेतल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT