Transgender News Saam Tv News
देश विदेश

Shocking Video: आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, नंतर लिंग बदलतात; ट्रान्सजेंडर टोळीची दहशत, पाहा धक्कादायक VIDEO

Uttar Pradesh Banda Transgender Gang: तरूणांना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. नंतर अनैसर्गिक अत्याचार करतात, आणि शेवटी तरुणांना लिंगबदल करून तृतीयपंथी बनवतात. मात्रा, या टोळीचा भंडाफोड झाला आहे.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये ट्रान्सजेंडर टोळीची दहशत माजली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. नंतर अनैसर्गिक अत्याचार करतात, आणि शेवटी तरुणांना लिंगबदल करून तृतीयपंथी बनवतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण ही घटना बांदामध्ये घडत होती. आतापर्यंत अनेक तरुणांचे लिंग बदल करून तृतीयपंथी बनवण्यात आले आहे. मात्र, एका व्हायरल व्हिडिओमुळे या टोळीचा भंडाफोड झालाय.

ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या बांदामध्ये घडलीय. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल झालाय. ज्यात नग्न अवस्थेत असलेल्या तरुणाला तृतीयपंथी अमानुषपणे मारहाण करीत आहे. तृतीयपंथी होण्यास नकार देत असल्यामुळे त्या तरुणाला मारहाण करण्यात येत होते. नंतर तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत, तृतीयपंथीयांची गँग तरूणांना फसवून लिंग बदल करण्यास भाग पाडतात, असं सांगत गुन्हा नोंदवला. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली.

व्हायरल व्हिडिओतील तरुणाचे नाव बच्चा असे आहे. तो बिसांडा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी आहे. या तरुणाला आधी तृतीयपंथी गँगनं आपल्या जाळ्यात ओढलं. नंतर लिंग बदल करण्यासाठी त्याच्यावर अमानुष अत्याचार केला. त्याने तृतीयपंथी होण्यास नकार दिल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हे प्रकरण अटारा पोलीस स्टेशन हद्दीतील, अटारा शहरातील असल्याचं समोर आलं.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, कानपूरमधील बनावट दवाखान्यात डॉक्टरांकडून १२हून अधिक निष्पाप तरुणांवर लिंग बदलाचे ऑपरेशन करण्यात आलंय. त्यांना हार्मोन्स बदलणाऱ्या औषधांचा ओव्हरडोज देण्याबरोबरच नशेचे इंजेक्शन देण्यात येते. नंतर लिंग बदल केले जाते. या टोळीबरोबर स्थानिक अटरा ठाण्याचा देखील सहभाग असल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असून, या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT