Odisha Bus accident  X social Media
देश विदेश

Odisha Bus accident : भाविकांवर काळाचा घाला! भरधाव बस २० फूट दरीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू

Odisha Bus accident update : ओडिशामध्ये भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव बस २० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Saam TV News

ओडिशा : ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यातील जलेश्वरमध्ये शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. जलेश्वरमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. भाविकांची बस थेठ २० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये १६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

उत्तर प्रदेशहून ५७ भाविक जगन्नाथ महाप्रभूचं दर्शन करण्यासाठी 'कृष्णा' नावाच्या बसने निघाले होते. या भाविकांची बस १८ मार्चला निघाली होती. काल या भाविकांची बस कोलकाताहून पुरीसाठी रवाना झाली होती. काल रात्री एक वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे बसवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर ही बस २० फूट दरीत कोसळली.

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरून पेट्रॉलिंग व्हॅन, जलेश्वर पोलीस आणि अग्निशमन दल हे बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी घटनास्थळी जखमी झालेल्या २३ लोकांना तातडीने बसमधून बाहेर काढलं. यामध्ये १६ जणांची प्रकृती नाजूक असल्याचं बोललं जात आहे.

जलेश्वर येथे झालेल्या अपघातात ४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश झाला आहे. या घटनेत मृत झालेल्या भाविकांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये राजेश कुमार मिश्रा, कमला देवी यादव, राज प्रसाद यादव आणि शांताराम यादव यांच्या रुपात ओळख झाली आहे. तसेच या अपघातातून वाचलेल्या लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे.

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

या अपघातातील एका जखमीने सांगितलं की, 'भाविकांची यात्रा १८ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशहून निघाली होती. आम्हाला माहीत नाही की, अपघात कसा झालाय. माझ्या कुटुंबातील दोन सदस्यही सोबत होते. मध्य रात्र झाल्याने बसमधील भाविक झोपले होते'. दुसऱ्या भाविकाने सांगितलं की, 'आम्ही जगन्नाथ धामला चाललो होतो. आम्ही या आधी अनेक ठिकाणी फिरून आलो होतो. मी माझ्या वडिलांना शोधत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT