Bajrang Dal Activist Saam Tv
देश विदेश

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; हिजाबविरोधी पोस्टमुळे खुनाचा आरोप

हिजाबविरोधी पोस्ट केल्यामुळे हर्षाची हत्या झाल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जात आहे.

Shivani Tichkule

बंगळुरू - गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून (Hijab Controversy) कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच आता कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घातल्याच्या वादात नवा मुद्दा निर्माण झाला आहे. शिमोगा जिल्ह्यात रविवारी रात्री बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर तणाव वाढला आहे. २६ वर्षीय हर्ष हा बजरंग दलाचा कार्यकर्ता होता, त्याची हत्या करण्यात आली आहे. वार झाल्यानंतर हर्षाला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हिजाबविरोधी पोस्ट केल्यामुळे हर्षाची हत्या झाल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जात आहे. (Bajrang Dal activist stabbed to death in Karnataka)

हे देखील पहा -

पण ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली? याची कोणीतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याने शिमोगा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणाव वाढला असून हिंदू संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई करत सुरक्षा व्यवस्था वाढवली असून कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. हिजाबच्या वादातूनही ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे, मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून याला दुजोरा मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT