Supreme Court on Bailgada Sharyat saam tv
देश विदेश

Bailgada Sharyat: आज ठरणार बैलगाडा शर्यतीचं भवितव्य, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष

Supreme Court On Jallikattu: आज बैलगाडा शर्यतीचे भवितव्य ठरणार असल्याने बैलगाडाप्रेमींचं या निकालाकडे लक्ष लागले आहे.

Chandrakant Jagtap

>> रोहिदास गाडगे, साम टीव्ही

Supreme Court on Bailgada Sharyat : गावगाड्यावरच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्याॉ बैलगाडा शर्यतीचं भवितव्य आज ठरणार आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर आज अंतिम निकालाचे वाचन होणार आहे. यामध्ये तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन होणार आहे. आज बैलगाडा शर्यतीचे भवितव्य ठरणार असल्याने बैलगाडाप्रेमींचं या निकालाकडे लक्ष लागले आहे.

डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत सर्व बाजु न्यायालयाने ऐकुन घेतल्या.

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली.

16 डिसेंबर 2021 ला न्यायमूर्ती खानविलकर, न्यायमूर्ती रविकुमार, न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी अटी आणि शर्तीसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. बैलगाडा शर्यती बंदीविरोधात लढा कसा होता हे थोडक्यात जाणून गेऊया.

- ११ जुलै २०११ ला केंद्रसरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने बैल (सांड) या प्राण्याचा गँजेटमध्ये समावेश केला.

- १९६० च्या प्राणी कायद्याअंतर्गत अस्वल, माकड, वाघ, तेंदूवा, सिंह, आणि सांड/बैल यांचा समावेश केला.

- यानंतर महाराष्ट्र सरकारने २४ ऑगस्ट २०११ रोजी परिपत्रक काढून बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली.

- बैलगाडा मालक संघटनांनी प्राणी मित्र संघटनांच्या निर्णयाला आव्हाहन देत उच्च न्यायालयाचे दार थोटावले. (Latest Marathi News)

- उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देत १५ फेब्रुवारी २०१३ ला काही नियम व अटी घालून तात्पुरत्या स्वरूपात शर्यंतींना परवानगी मिळाली.

- प्राणी मित्र संघटनांनी पुन्हा न्यायालयाचे दार थोटावले आणि बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना मारहान करण्यात येत असून बैलांचा छळ केला जातो असे न्यायालयात सांगीतले.

- पुन्हा उच्च न्यायालयाने ७ मे २०१४ रोजी प्राणी कायद्याचे उल्लघन केल्या प्रकरणी बंदी कायम केली.

- १२ एप्रिल २०१७ ला राज्यसरकारने शर्यती सुरु करण्यासाठी कायदा तयार केला. मात्र कायद्याविरोधात प्राणीमित्रांनी हायकोर्टात आवाहन दिले.

- १६ ऑगस्ट २०१७ ला हायकोर्टाने राज्य सरकारच्या कायद्याला स्थगिती दिली.

त्यानतंर 16 डिसेंबर 2021 ला न्यायमूर्ती खानविलकर, न्यायमूर्ती रविकुमार, न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी अटी आणि शर्तीसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली होती. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

SCROLL FOR NEXT