Baby Birth
Baby Birth  Saam tv
देश विदेश

आता ट्रेनमध्ये काळजी न करता झोपणार आई आणि बाळ; रेल्वेने सुरू केली ही सेवा

वृत्तसंस्था

Railway Baby Berth: भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत ज्या महिलांना लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी लखनऊ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या लखनऊ मेल ट्रेनमध्ये एक नवीन कोच तयार करण्यात आला आहे. या डब्यात महिला प्रवाशांच्या नवजात बालकासाठी बेबी बर्थ जोडण्यात आली आहे. जेणेकरुन मातांना त्यांच्या बाळांसह आरामात झोपता येईल.

लोअर बर्थला रेल्वेने एक खास सीट लावण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर लहान बाळ झोपेत खाली पडू नये यासाठी उपाय म्हणून रेल्वे बर्थच्या बाजूला स्टॉपर देखील लावण्यात आले आहे. बेबी बर्थमध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी या घेण्यात आली आहे.'बेबी बर्थ' 770 मिमी लांब आणि 255 मिमी रुंद असेल, तर त्याची जाडी 76.2 मिमी ठेवण्यात आली आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली, लवकरच हा बेबी बर्थ अनेक ट्रेनमध्ये पाहायला मिळणार आहे.

सध्या, लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी या सीटचे बुकिंग करण्याची तरतूद नाही. या सुविधेचा विस्तार आणि व्यापारीकरण झाल्यानंतर याचा वापर करणाऱ्या महिलांना या सेवेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे सध्या 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्ण भाडे आकारते, पूर्वी ते 50 टक्के होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

SCROLL FOR NEXT