बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचं जगभरात कुतूहल असतं. 2026 च्या भविष्यवाणीची मात्र सगळ्यांनीच धास्ती घेतली आहे. कारण आगामी वर्षात मोठ्या संकटाचा उल्लेख त्यांनी केला आहे. 2026 या वर्षात पृथ्वीचा दहावा भाग नाहीसा होईल. पश्चिमात्य देश 'राखेचा ढीग' बनतील या भाकिताने जग हादरले आहे.
2026 मध्ये घडणार या घटना?
2026 मध्ये जग महायुद्धाच्या खाईत लोटलं जाईल. अनेक देशांना युद्धाची झळ बसेल. या युद्धानंतर रशियातील एका शक्तिशाली नेता उदयास येईल. त्याला "जगाचा स्वामी" म्हणून ओळखले जाऊ शकते.
बाबा वांगा यांच्या मते, हे महायुद्ध जगात राजकीय आणि मोठे आर्थिक बदल घडवून आणेल.
आर्थिक संघर्षात सोन्याचे दर गगनाला भिडणार आहेत. महागाई वाढेल. काही देशांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.
त्याशिवाय 2026 मध्ये भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि मोठे हवामान बदल होतील. या नैसर्गिक आपत्ती पृथ्वीवरील 7 ते 8% भागावर परिणाम करतील.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आणखी शक्तिशाली होईल. त्याचा परिणाम नोकऱ्यांवर दिसून येईल.
बाबा वेंगांची भविष्यवाणी अनेकदा
तिच्या कोड्यांमध्ये लपलेली असते. अंध असलेल्या बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बुल्गारियामध्ये झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य बल्गेरियातील रुपिटे गावात गेले. एक गूढवादी आणि वनौषधी तज्ञ म्हणून त्या ओळखल्या जातात. निधनानंतरही त्यांची भाकित खरी ठरत असल्यानं चर्चेत आहेत. त्यांच्या भविष्यवाणीतील 5079 पर्यंतच्या घटनांचा अंदाज लावता येण्याजोगा आहे.
2026 मधील त्यांच्या भाकिताने मात्र जगाचं टेन्शन वाढलंय. कारण त्यांचे संकेत आतापासून मिळू लागले आहेत. भारतात सोन्याचा दर दीड लाखांच्या घरात गेलाय. पुढच्या वर्षी हा दर आणखी किती पटीनं वाढेल याची चिंता अनेकांना सतावतेय. त्याशिवाय अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटांमुळे हवामानात बदल झाल्याचं लक्षात येत आहे. मात्र अशी स्थिती असली तरी आणखी दोन महिन्यानंतर काय बदल होणार याची चिंता करण्यापेक्षा सकारात्मक राहून नवीन वर्षाचे आनंदाने, मोठ्या आशेने स्वागत करणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.