Hidden camera footage exposes alleged donation theft inside Ayodhya Ram Temple counting room saam tv
देश विदेश

रामलल्लाच्या दानपेटीवर 1400 कोटींचा डल्ला? छुपा कॅमेऱ्यानं फोडलं चोरांचं बिंग

Ayodhya Ram Temple Donation Scam Hidden Camera Expose: अयोध्येतील रामलल्लाच्या दानपेटीतून हजारो कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला गेला... यासंदर्भात 8 जणांना अटक देखील करण्यात आलीये. मात्र, राम मंदिरातील चोरीचं बिंग कसं फुटलं? चोरांची मोडस ऑपरेडी कशी होती...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

देशभरातील करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दानावर चोरांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.... हे चोर दुसरे तिसरे कोणी नसून मंदिराच्या अंतर्गत व्यवस्थेतीलच कर्मचारी असल्याचा आरोप आहे. 40 दिवसांत 70 चोऱ्या' झाल्याचा प्राथमिक अहवाल आता सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलाय़... त्यात राम मंदिरातून 1400 कोटींची चोरी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय...त्यामुळे या वादाच्या केंद्रस्थानी असलेले राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिलेत... मात्र दानपेटीतल्या पैशांच्या चोरीचा हा डाव नेमका कसा रचला गेला आणि त्याचं कसं बिंग फुटलं ते पाहूयात...

राम मंदिरात साधारणपणे एका दानपेटीत एका वेळी 7 ते 8 लाख रुपये जमा होतात.. मात्र, काही आठवड्यांपासून 500 रुपयांच्या नोटांची बंडलं अचानक कमी होत असल्याचं समोर आलं. संशय बळावल्याने नोटा मोजणीच्या खोलीत छुपे कॅमेरे बसवण्यात आले... आणि तिथूनच या महापापाचा पर्दाफाश झाला. नोटा मोजणारे कर्मचारी मुख्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर असे उभे राहायचे जेणेकरून कॅमेऱ्यात काही दिसणार नाही. याच आडोशाचा फायदा घेऊन त्यांचे साथीदार नोटांच्या बंडलांमधून पैसे काढून आपल्या कपड्यांमध्ये लपवायचे.

काही आरोपी ही बंडलं बाथरुममध्ये लपवायचे आणि संधी मिळताच मंदिराबाहेर नेऊन वाटून घ्यायचे. त्यात मुख्य आरोपी अनुकल्प मिश्रा हा व्हाउचर प्रक्रियेशी जोडलेला होता. कर्मचारी नोटांच्या बंडलात काही अतिरिक्त नोटा टाकायचे....बँकेत संपूर्ण नोटा मोजण्याऐवजी फक्त बंडलं मोजून व्हाउचर बनवलं जायचं. नंतर मंदिरातून बँकेत पैसे नेताना बंडलातील त्या अतिरिक्त नोटा काढून घेतल्या जायच्या. त्यामुळे बँकेचा आकडा आणि व्हाउचर जुळायचं, मात्र बंडलमध्ये टाकलेल्या अतिरिक्त नोटांची मधल्या मधे चोरी व्हायची.

अखेर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली. एसआयटीने 6 दिवस अयोध्येत राहून सखोल चौकशी केली आणि आपला प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला. त्यानंतर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यामुळे शंकराचार्यांऐवजी खास लोकांना बसवून चोरी करण्याचा उद्देश होता... असा आरोप अविमुक्तेश्वरानंद यांनी केलाय

धक्कादायक बाब म्हणजे राम मंदिरातून 60 किलो चांदीच्या विटाही चोरीला गेल्याचा आरोप केलाय जातोय... त्यामुळे श्रद्धेच्या ठिकाणी झालेली ही चोरी केवळ पैशांची चोरी नाही, तर कोट्यवधी रामभक्तांच्या विश्वासाला गेलेला हा तडा आहे. ड्युटीवरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी न करण्याच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे हा प्रकार घडल्याचं बोलले जातयं...आता एसआयटीच्या सखोल तपासातून या राम मंदिर चोरी प्रकरणातील आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार? आणि या संपूर्ण गैरव्यवहाराचा मुख्य मास्टरमाईंड कोण आहे? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; ३ राज्यांच्या संघटनेत अचानक केले बदल, संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी

खासगी रुग्णालयांमधील लुटीला चाप बसणार, खासगी रुग्णालयांना आता रेट कार्ड बंधनकारक, आरोग्यमंत्र्यांची घोषणा, 'साम'चा रियालिटी चेक

SCROLL FOR NEXT