Ram Mandir Ayodhya Latest News Saam TV
देश विदेश

Ram Mandir Ayodhya: राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्ला विराजमान; अयोध्येतील पहिला फोटो आला समोर...

Ram Mandir News: गुरुवारी राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे.

Satish Daud

Ram Mandir Ayodhya Latest News

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा विधी सुरू असून येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी शास्त्रानुसार एकामागून एक पूजा केल्या जात आहेत. याच अनुषंगाने गुरुवारी राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेदमंत्रांच्या उच्चारात रामललाच्या अचल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास ६ तास पूजा सुरू होती. आचार्य गणेशवर द्रविड आणि काशीचे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा प्रक्रिया पार पडली.

अशोक सिंहला फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भागचंदका हे प्रमुख यजमान होते. रामललाची अचल मूर्ती अजूनही झाकलेली आहे. २० जानेवारीला मूर्तीवरील कव्हर काढले जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी केवळ झाकलेल्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

रामलल्लाची मूर्ती, गर्भगृह आणि यज्ञमंडप यांना पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. पूजेदरम्यानच राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाचा (Ram Mandir) जलाधिवास आणि गंधाधिवास देखील झाला. रामललाच्या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करून हा शुभ सोहळा संपन्न झाला.

आता २२ जानेवारीला अभिषेक होणार आहे. दरम्यान, कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही प्रभूरामचंद्राची मूर्ती तयार केली आहे. अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT