Ram mandir murti photo hd Saam TV
देश विदेश

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त अवघ्या ८४ सेकंदांचा, वाचा कसा असेल कार्यक्रम?

Live puja ayodhya ram mandir : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी 10 वाजल्यापासून मंगल ध्वनी वादनाचा कार्यक्रम होणार आहे.

प्रविण वाकचौरे

Ram Mandir :

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या काही तासात मागील ५०० वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. संपूर्ण रामभक्तीत तल्लीन झाली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक क्रिकेटपटू, सेलिब्रिटी, उद्योगपती, संत आणि विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी 10 वाजल्यापासून मंगल ध्वनी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. विविध राज्यातील 50 हून अधिक वाद्ये सुमारे दोन तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असतील. (Latest Marathi News)

आज (22 जानेवारी) दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी सुरू होईल. प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा अभिजीत मुहूर्तावर होईल. काशीचे विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ निश्चित केली आहे. प्राणप्रतिष्ठा पौष महिन्याच्या द्वादशी तारखेला (22 जानेवारी 2024) अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये होईल.

84 सेकंदांचा मुहूर्त

शुभ मुहूर्त सकाळी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिट आणि 32 सेकंद असेल. म्हणजे प्राणप्रतिष्ठेची शुभ मुहूर्त फक्त 84 सेकंद आहे. श्री रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

काशीचे प्रसिद्ध वैदिक आचार्य गणेश्वर द्रविड आणि आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली 121 वैदिक आचार्यांकडून हा विधी पार पडणार आहे. या काळात 150 हून अधिक परंपरा आणि 50 हून अधिक आदिवासी, गिरिवासी, तटवासी, द्वीपवासी परंपरांचे संत आणि धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.

PM मोदी चार तास अयोध्येत

PM मोदी आज चार तास अयोध्येत राहणार आहेत. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी अयोध्या विमानतळावर आणि त्यानंतर 10.55 वाजता रामजन्मभूमीला पोहोचेल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर ते 1 वाजता निघून उपस्थितांना संबोधित करतील. 2.10 वाजता कुबेर टिळ्याचे दर्शन घेऊन मोदी दिल्लीला परतणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT