Ayodhya Ram Mandir Darshan Latest News  Saam TV
देश विदेश

Ayodhya Ram Mandir: प्रभू श्रीराम भेटीची ओढ... भक्तांचा सुरक्षा भेदून राम मंदिरात प्रवेश, पोलिसांची तारांबळ; VIDEO व्हायरल

Ram Mandir News: अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत श्रीराम प्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आज भाविकांसाठी दर्शन खुलं केलं आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Lalla Darshan In Ayodhya

अयोध्येत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात (Ayodhya Ram Mandir) आला. यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय. प्रत्येकाच्या मनात श्रीराम प्रभुंच्या दर्शनाची ओढ आहे. त्यामुळे प्रत्येकजण मंदिरात गर्दी करत आहेत. अगदी सुरक्षा व्यवस्था तोडून भाविकांची गर्दी पुढे चालल्याचं दिसतंय. (latest ram mandir update)

भाविकांची मोठी गर्दी

आज सर्वसामान्यांनी मात्र श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रचंड गर्दी केलीय. त्यामुळं काही वेळासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश बंद केला होता. राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना रोखण्यात आलं होतं. भाविकांची मोठी गर्दी पाहून हा निर्णय घेण्यात आला होता. मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून भाविकांचा ओघ कायम आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाविकांना सतर्क राहण्याच्या सुचना

इतर सुरक्षा एजन्सी लोकांना सतर्क करण्यासाठी सतत घोषणा करत आहेत. भाविकांना त्यांच्या चप्पल, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सांगत आहेत. येथे निमलष्करी घटनास्थळी दलाला पाचारण करण्यात आलंय. भाविकांसाठी, वाहनांसाठी रस्ता मोकळा करण्यात येत आहे.

मंदिरात (Ram Mandir) जाण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांग आहे. पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात येत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे.

भाविकांची प्रचंड गर्दी

राम मंदिरात (Ayodhya) प्रचंड गर्दी दिसत आहे. हजारो भाविकांनी सुरक्षा कठडेही तोडले आहेत. राम मंदिराबाहेरील सुरक्षा अडथळ्यांमधून बाहेर पडताना भाविक 'जय श्री राम' चा नारा देत होते. राम मंदिरात प्रचंड गर्दी झाल्याने प्रवेश बंद करण्यात आलाय. रामलल्लाचं दर्शन दुपारी २ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचं दिसत आहे. राम मंदिर परिसरात अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती (ram mandir) आहे. सर्वच भक्तगण जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. दर्शनासाठी पुढे पुढे जात आहेत. पोलिसांनाही गर्दी सांभाळणं कठिण होत असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT