Ayodhya Tourist Place Saam TV
देश विदेश

Ayodhya Tourist Place: अयोध्येत आलात? मग या नयनरम्य ठिकाणी देखील नक्की भेट द्या

Ayodhya Must Visit Places: अयोध्येतील हे ठिकाण संपूर्ण सफेद रंगाच्या संगमरवर दगडाने बनवण्यात आलं आहे. यामध्ये तब्बल 34 गुफा आहेत. 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेण्या देखील आहेत.

Ruchika Jadhav

Ayodhya:

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. यानिमित्त जगभरातून अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघालेत. अयोध्येत आल्यावर राम मंदिरात दर्शन घेतल्यावर येथे अन्य काही पर्यटन स्थळे देखील आहेत. तुम्ही मोठी सुट्टी घेऊन आले असाल तर अयोध्येतील या ठिकाणांना नक्की भेट द्या.

त्रेता ठाकुर

अयोध्येतील नवीन घाटाजवळ तेत्रा ठाकूर मंदिर आहे. येथे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत आणि सुग्रीव यांच्या मुर्त्या आहेत. या सर्व मुर्त्या एकाच दगडापासून बनवण्यात आल्याचे म्हटले जाते.

छोटी छावणी

वाल्मिकी भवन किंवा मनिरामदास छावणी या नावाने ही छावणी ओळखली जाते. अयोध्येतील हे ठिकाण संपूर्ण सफेद रंगाच्या संगमरवर दगडाने बनवण्यात आलं आहे. यामध्ये तब्बल 34 गुफा आहेत. 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेण्या देखील आहेत.

तुलसी स्मारक भवन

संत कवी गोस्वामी तुलसीदास यांच्या स्मरणार्थ तुलसी भवन बांधण्यात आलं आहे. अयोध्येतील राजगंगा कॉर्सिंगवरील राष्ट्रीय राजमार्ग येथे हे भवन आहे. 1969 मध्ये तुलसी स्मारक भवन बांधण्यात आले. येथे अयोध्येतील सांस्कृतिक, अध्यात्मिक माहिती मिळते.

बहु बेगम मकबरा

फैजाबाद शहरात बहु बेगम मकबरा आहे. काही जण याला पूर्वेकडील ताजमहाल म्हणून देखील ओळखतात. नवाब शुजा-उद-दौला यांच्या पत्नी आणि राणी बेगम उन्मतुज़ोहरा बानो यांना समर्पित हा बहु बेगम मकबरा उभारण्यात आला आहे. 1816 मध्ये याची निर्मिती करण्यात आली.

त्यामुळे आता मोठी सुट्टी घेऊन तुम्ही अयोध्येत येणार असाल तर या ठिकाणी देखील भेट देऊ शकता. येथील नयनरम्य वातावरण अनेक पर्यटकांच्या पसंतीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? प्रत्येक लेव्हलसाठी पगारवाढ वेगळी होणार

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर काोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली

Chandra Grahan: चंद्र ग्रहण असताना रंगपंचमी खेळू शकतो का? जाणून घ्या

Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं

SCROLL FOR NEXT