Bhushan Sharan Singh Rally  ANI
देश विदेश

Bhushan Sharan Singh Rally : कुस्तीपटूंबद्दल अनावश्यक वक्तव्ये टाळा, ब्रिजभूषण यांना BJP हायकमांडचे आदेश

Wrestlers Protest Update: भाजप हायकमांडच्या सूचनेनुसार ब्रिजभूषण यांनी 5 जून रोजी होणारी प्रस्तावित सभा रद्द केली आहे.

Priya More

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह (Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन (Wrestlers Protest) मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलक कुस्तीपटुंनी घेतला आहे. अशामध्ये आता याप्ररणी भाजप हायकमांडने कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणात कारवाई होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नेतृत्वाने ब्रिजभूषण यांना कुस्तीपटूंच्या बाबतीत अनावश्यक वक्तव्ये टाळण्याची सूचना केली आहे. भाजप हायकमांडच्या सूचनेनुसार ब्रिजभूषण यांनी 5 जून रोजी होणारी प्रस्तावित सभा रद्द केली आहे. कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोप असलेले ब्रिजभूषण यांना भाजपने रॅली न घेण्यास सांगितले होते. ब्रिजभूषण यांची 5 जून रोजी अयोध्येत जनजागृती रॅली काढणार होते.

भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी दावा केला होता की, अयोध्येतील त्यांच्या या रॅलीमध्ये 11 लाख लोकं त्यांच्या समर्थनार्थ येणार आहेत. पण आज त्यांनी फेसबुक पोस्ट करत ही रॅली रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या प्रिय शुभचिंतकांनो! तुमच्या पाठिंब्याने मी गेली 28 वर्षे लोकसभेचा सदस्य म्हणून काम केले आहे. मी सत्तेत असताना आणि विरोधात असताना सर्व जाती, समाज आणि धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणांमुळे माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्या पक्षांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.'

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहेले आहे की, 'सध्याच्या परिस्थितीत काही राजकीय पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढून प्रांतवाद, प्रादेशिकवाद आणि जातीय संघर्ष वाढवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण समाजात पसरलेल्या दुष्कृत्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी 5 जून रोजी अयोध्या येथे संत संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण आता पोलीस या आरोपांची चौकशी करत असून सुप्रीम कोर्टाच्या गंभीर निर्देशांचा आदर करत आहेत. अयोध्येत होणारी ही महारॅली काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.'

दरम्यान, या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ब्रिजभूषण यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले आहे. तसंच त्यांचे कुटुंब नेहमीच ऋणी राहील. ब्रिजभूषण यांची रॅली रद्द करण्याची घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा खाप पंचायती कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. गुरुवारी मुझफ्फरनगरमधील सोराम येथे सर्वजाती खाप पंचायतीनंतर शुक्रवारी कुरुक्षेत्रमध्ये महापंचायत बोलावण्यात आली आहे. कुस्तीपटूंचे हे आंदोलन आता वाढतच चालले आहे. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. या सर्व कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

SCROLL FOR NEXT