New Year Rules Saam Tv
देश विदेश

New Year Rule : सावधान! नवीन वर्षाच्या जल्लोषात 'या' गोष्टी कराल, तर थेट जेलमध्ये जाल, पोलिसांनी दिला इशारा

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये काय करू नये?

वृत्तसंस्था

New Year Rule : सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्य्त तयारी सुरु आहे. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहानं तयारी करत असल्याचं, आणि त्याकरता पर्यटनाच्या ठिकाणी जात असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे. काहीजण आपल्या कुटुंबासह तर काही मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे. मात्र नवीन वर्ष साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवा तितकेच महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते इतकेच नाही तर लाखोंचा दंड ही भरावा लागणार.

नवीन वर्षात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत. 31 डिसेंबर रोजी दिल्लीत 16,500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय एक हजारहून अधिक वाहतूक पोलिस आणि 20 कंपनीचे फौजफाटा विविध भागात तैनात करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनीही वाढवली सुरक्षा

मुंबई पोलिसांनीही सुरक्षा वाढवली आहे. 31 डिसेंबर रोजी शहरात 11,500 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी बीच, जुहू बीच, वांद्रे बसस्टँड यासह अनेक विशेष भागात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी सर्व पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

याशिवाय साध्या वेशातील पोलीस देखील वेगवेगळ्या ठिकाणी हजर राहणार आहेत, जेणेकरून चोरट्यांना ओळखता येईल. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना पकडता यावे यासाठी १०० हून अधिक ठिकाणी नाके लावण्यात आले आहेत. कोणी रेव्ह पार्टी करताना किंवा अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये काय करू नये?

नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या उत्साहात काही लोक संवेदना गमावून बसतात. अनेकदा काही अतिउत्साही लोक जास्त दारू पिऊन गाडीही चालवतात. दारू पिऊन गाडी चालवणे हे बेकायदेशीर तर आहेच, पण ते जीवघेणेही आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे मृत्यू अनेक लोकांचा अपघात झाला आहे. देशात दारू पिण्यास बंदी नाही, पण दारू पिऊन गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. यामुळे हे टाळावे.

वीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये अतिवेगाने गाडी चालवणे हा देखील एका गुन्हा आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार, जर एखादी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवताना पकडली गेली, तर त्याला 6 महिने कारावास किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर दुसऱ्यांदा असे करताना पकडले गेल्यास दोन वर्षे तुरुंगवास किंवा तीन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

रेव्ह पार्टी करताना पकडले गेल्यास आणि त्या पार्टीत ड्रग्जही वाटले जात असतील तर, तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणेही कठीण होते. आपल्या देशात अमली पदार्थ बाळगणे, खरेदी करणे, विकणे किंवा सेवन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT