Attempts to smuggle explosives by drone Twitter/@ANI
देश विदेश

J & K : ड्रोनद्वारे स्फोटकांच्या तस्करीचा प्रयत्न; BSF ने हवेत गोळीबार करत उधळला कट

3 magnetic IEDs with timer set dropped by drone recovered in border area of Jammu: या गोळीबारामुळे ड्रोन पाकिस्तानच्या सीमेकडे शिरले, ते पळून जाण्यात यशस्वी ठरले, मात्र सोबत असलेली स्फोटके या ड्रोनला सोडावी लागली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या कानचाक परिसरात (Kanachak area) ड्रोनद्वारे (Drone) स्फोटकांची (Explosive) तस्करी करण्याचा कट बीएसएफने (BSF) उधळला आहे. या ड्रोनला लहान मुलांचे तीन टिफिन बॉक्स (जेवणाचा डबा) लावण्यात आले होता. यात स्फोटकं होती. या स्फोटकांची दहशतवाद्यांना तस्करी करण्यात येणार होती. त्यासाठी पाकिस्तामधून हे ड्रोन ऑपरेट करण्यात येत होते. मात्र ड्रोन दिसताच बीएसएफच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार (Firing) केला. या गोळीबारामुळे ड्रोन पाकिस्तानच्या सीमेकडे शिरले, ते पळून जाण्यात यशस्वी ठरले, मात्र सोबत असलेली स्फोटके या ड्रोनला सोडावी लागली. जवळपास ८०० मीटर उंचीवरुन हे ड्रोन उडत होते. (3 magnetic IEDs with timer set dropped by drone recovered in border area of Jammu)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ११ च्या सुमारास बीएसएफने कानाचक परिसरात संशयीत ड्रोनच्या हालचाली पाहिल्या आणि ड्रोनवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तत्काळ पोलीस दल तैनात करण्यात आले आणि ड्रोनविरोधी एसओपीचे (ड्रोन दिसल्यास करावयाची कारवाई याबाबतची नियमावली - SOP)पालन करण्यात आले. रात्री ११ च्या सुमारास कानाचक येथील दयारण भागात पोलिस दलाने ड्रोनची हालचाल पाहिली आणि त्यावर पुन्हा गोळीबार केला. यावेळी ड्रोनला जोडलेले पेलोड (सामान) खाली पाडण्यात आले. या पेलोडमध्ये शाळकरी मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले 3 चुंबकीय आयईडी ( magnetic IEDs) होते आणि वेगवेगळ्या वेळेसाठी यात टायमर सेट केला गेला होता. त्यानंतर ही आयईडी स्फोटकं निष्क्रिय करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मंगळवारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, हवाई मार्गाने स्फोटकांची तस्करी करण्याच्या नव्या प्रयत्नात पोलिसांनी जम्मू जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ड्रोनने टाकलेले तीन चुंबकीय आयईडी जप्त केले आहेत. अखनूर सेक्टरमधील कानाचकच्या कांटोवाला-दयारन भागातून त्यांचे टायमर सेट आणि पॅक केलेले आयईडी जप्त केले गेले आहेत अशी माहिती जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) मुकेश सिंग यांनी दिली आहे.

जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) मुकेश सिंग यांनी माहिती दिली की, सोमवारी रात्री बीएसएफच्या जवानांनी जम्मू जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवर एक गुणगुणणारा आवाज ऐकला ज्यामुळे ड्रोन आसपास उडत असल्याचा संशय निर्माण झाला तेव्हा जवानांनी हवेत काही काळ गोळीबार केला. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अखनूर परिसरात सुमारे 800 मीटर उंचीवरून आवाज येत असल्याचे ऐकून सतर्क जवानांनी दोन राऊंड गोळीबार केला. एक पोलीस दल ताबडतोब तैनात करण्यात आले आणि त्यांनी परिसरात ड्रोनविरोधी मानक कार्यपद्धतीचे पालन केले. रात्री ११ च्या सुमारास, सुरक्षा दलांनी कानाचकच्या दयारण भागात ड्रोन पाहिला आणि त्यावर पुन्हा गोळीबार केला, असे एडीजीपी म्हणाले.

या ड्रोनला जोडलेला पेलोड खाली आणला गेला होता पण ड्रोन शूट करता आला नाही. नियंत्रित स्फोटाद्वारे आयईडी स्फोटकांची विल्हेवाट लावण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनचा धोका सर्वत्र आहे, परंतु या प्रदेशात सीमेपलीकडून कोणताही कट उधळून लावण्यासाठी सुरक्षा दल सतर्क आहेत, असे सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, सीमेवरील लोकांचे संरक्षण करण्यासाठी लष्कर आणि बीएसएफ नियंत्रण रेषेवर (एलओसी) पूर्णपणे सक्षम आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT