वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर जिल्ह्यामधील २ खाजगी शाळांच्या व्यवस्थापकांवर १७ मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यांना अंमली पदार्थ देऊन बलात्कार (abuse) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी(police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याने एका पोलीस अधिकाऱ्यालाही हद्दपार करण्यात आले आहे. Attempted abuse 17 girls under pretext of practicals
हे देखील पहा-
मुझफ्फरनगर(Muzaffarnagar) जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार की, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) (BJP) नेते आणि स्थानिक आमदार प्रमोद उटवाल यांच्या मध्यस्थीनंतर कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, पुरकाजी पोलिस स्टेशनचे प्रभारी विनोद कुमार सिंह यांना या प्रकरणामध्ये निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता.
त्याचबरोबर भोपा पोलीस ठाण्यातील सूर्यदेव पब्लिक स्कूलचे संचालक योगेश कुमार चौहान आणि पुरकाजी परिसरातील जीजीएस इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अर्जुन सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, अंमली पदार्थ आणि POCSO कायदा या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींना प्रॅक्टिकलसाठी दुसऱ्या शाळेत नेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार योगेश सूर्यदेव पब्लिक स्कूलमध्ये १० वी मध्ये शिकणाऱ्या १७ मुलींना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी GGS शाळेत घेऊन गेला होता आणि त्यांना रात्रभर तिथेच राहावे लागले होते. तेव्हा ही घटना घडली आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलींना अंमली पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार केले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आरोपींनी मुलींना या घटनेविषयी कोणालाही न सांगण्याची धमकी दिल्याची तक्रार कुटुंबीयांनी यावेळी केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यानंतर त्यांनी आमदारांशी (MLA) संपर्क साधला आहे. या प्रकरणात २ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.