आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान पुन्हा हादरलं. खैबर पख्तुनख्वाच्या उत्तर वजीरिस्तानमध्ये हा हल्ला घडवून आणला. यात सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले. वजीरिस्तानच्या मीर अली जिल्ह्यात ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, ते अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आत्मघाती हल्ला तहरीक ए तालिबान पाकिस्तानने घडवून आणला आहे.
आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन लष्कराच्या छावणीत घुसवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ते वाहन भिंतीला धडकलं आणि स्फोट झाला. या स्फोटानंतरच्या विदारक दृश्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या छावणीच्या परिसरातून धुराचे लोट बाहेर पडताना या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसेच एकापाठोपाठ एक स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. याच दरम्यान हा आत्मघाती हल्ला झाला आहे. अफगाणिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत पाकिस्तानचे डझनभर सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह कंधारसारख्या मोठ्या शहरांना लक्ष्य केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवार संध्याकाळपासूनच दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. मात्र, तणावाची परिस्थिती कायम आहे.
अफगाणिस्तानच्या दाव्यानुसार, आम्ही सडेतोड उत्तर दिलेले आहे. मात्र, सौदी अरेबिया आणि कतारसारख्या देशांच्या सल्ल्यानंतर शस्त्रसंधी लागू करण्यास तयार झालो आहोत. दुसरीकडे पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे. पाकचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी तर भारताकडूनही हल्ले होण्याची भीती व्यक्त केली आहे. आम्हाला दोन-दोन आघाड्यांवर संघर्षाचा सामना करावा लागू शकतो, असेही आसिफ म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.