Gujarat: एटीएसने मोरबीमधून जप्त केलं १२० किलो अंमली पदार्थ
Gujarat: एटीएसने मोरबीमधून जप्त केलं १२० किलो अंमली पदार्थ - Saam TV
देश विदेश

Gujarat: एटीएसने मोरबीमधून जप्त केलं १२० किलो अंमली पदार्थ

वृत्तसंस्था

अहमदाबाद: गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोरबीच्या जीनजुदा गावातून तब्बल १२० किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे. गुजरात एटीएसने आतापर्यंत तब्बल १२० किलो ड्रग्ज जप्त केले आहे अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

सप्टेंबर महिन्यात कच्छच्या मुद्रा बंदरातून डीआरआयने ३ हजार किलो हेरॉईन जप्त केले होते त्याची किंमत जवळपास २१ हजार कोटींच्या घरात आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएसने ही मोठी कामगिरी केली आहे. हे अंमली पदार्थ मुद्रा बंदरातून दोन कार्गो कंटेनरच्या मदतीने भारतात आणण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणाचा संबंध इराणशी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डीआरआयने या प्रकरणात चेन्नई स्थित एक जोडपं आणि कोईमबतोरमधून एका आरोपीला अटक देखील केली होती. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. गुजरातच्या मुद्रा बंदरात दोन कंटेनरमध्ये आढळून आले होते हे अंमली पदार्थ कंदहार स्थित हसन हुसैन लिमिटेडने निर्यात केले होते. तर विजयवाडा स्थित आशी ट्रेडिंग कंपनीने हे अंमली पदार्थ आयात केले होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

SCROLL FOR NEXT