ATM  Saam tv
देश विदेश

FACT Check: देशभरातील ATM खरंच २ ते ३ दिवस बंद राहणार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

No ATM Closures Nationwide: देशातील एटीएम पुढच्या २ ते ३ दिवस बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज वाचून नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. खरंच एटीएम बंद राहणार आहे की नाही? हे घ्या जाणून....

Priya More

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर वाढत्या तणावादरम्यान देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. आता एटीएममध्ये पैसे मिळणार नाहीत? एटीएममधील पैसे संपतील? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारा हा मेसेज फेक आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) हा व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना चिंता करण्याचे कारण नाही. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की, देशभरातील सर्व एटीएम २-३ दिवस बंद राहतील.

पीआयबीने यासंदर्भात ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज 'खोटा' आहे आणि एटीएम नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. हा मेसेज वाचल्यानंतर अनेकांना पैसे काढण्याची चिंता वाटू लागली. पण पीआयबीने लोकांना या चुकीच्या मेसेजकडे लक्ष देऊ नका आणि हा मेसेज पुढे पसरवू नका असे आवाहन केले आहे.

पीआयबीने त्यांच्या फॅक्ट चेक हँडल (@PIBFactCheck) वरून ट्विट केले आहे, 'एटीएम २-३ दिवस बंद राहतील असा दावा करणारा एक व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेज येत आहे. हा संदेश खोटा आहे. एटीएम सामान्यपणे सुरू राहतील. पडताळणी केल्याशिवाय मेसेज कोणासोतबही शेअर करू नका.

तसंच, 'सरकारने परिस्थिती स्पष्ट करण्याचा उद्देश लोकांमधील अनावश्यक भीती दूर करणे आणि एटीएम सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहतील याची खात्री करणे आहे.', असे देखील पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. एटीएम बंद राहणार नाही ही माहिती आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना सांगून त्यांच्या मनताली संभ्रम दूर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT