Atal Pension Yojana
Atal Pension Yojana  Saam TV
देश विदेश

Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेत मोठा बदल; आता या लोकांना मिळणार नाही लाभ

Satish Daud-Patil

नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी यासाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली. आता या योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबर २०२२ नंतर, अशी कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, जी आयकर भरेल. यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. (Atal Pension Yojana Latest News)

अटल पेन्शन योजना (APY) आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. अवघ्या ६ वर्षात ही योजना ४ कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ ९९ लाख लोकं या योजनेत सहभागी झाले आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार, आर्थिक वर्ष २०२२ च्या अखेरीस ४.०१ कोटी लोक या योजनेत गुंतवणूक करत होते.

अटल पेन्शन योजनेच्या नियमांत झाला बदल

एका वृत्तानुसार, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. . अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते उघडले जाईल, त्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे पैसे ग्राहकांना परत केले जातील. (Atal Pension Yojana News)

अटल पेन्शन योजनेत किती मिळतं पेन्शन?

अटल पेन्शन योजना (APY) ही भारतातील नागरिकांसाठी एक पेन्शन योजना आहे, जी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चालवली जाते. APY अंतर्गत, किमान पेन्शनची हमी आहे जी रु. १,०००, रु. २,०००, रु. ३,०००, रु. ४,००० किंवा रु.५,००० पर्यंत दिले जाते. ग्राहक या खात्यात पैसे जमा करतात, त्यानुसार वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शन मिळते.

मुदतपूर्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे गुंतवणुकीची रक्कम आणि तुमचे वय ठरवेल. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालविली जाते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT