Pradyut Bordoloi created a stir in political circles by resigning from the Congress party saam tv
देश विदेश

निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Congress MP Resignation: आसाम निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षांतर्गतील वाद चव्हाट्यावर आली आहे.

Bharat Jadhav

  • निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का.

  • आसाम विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खासदाराने राजीनामा दिला आहे.

  • आसाममध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

आसाम विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रद्युत बोरदोलोई यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दीड वर्षांपूर्वी भाजपचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचा दावा करणारे खासदारानेच पक्षाला रामराम केला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा दिल्याने त्यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे.

आपल्या राजीनामा पत्रात बोरदोलोई यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला. आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की, ते पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहेत. यापूर्वी आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी आत्मसन्मानाचे कारण देत पक्ष सोडला होता.

बोरा हे तीन दशकांहून अधिक काळ आसाममधील काँग्रेसशी संबंधित होते. आता ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. बोरदोलोई यांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेस पक्षाने अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नसले तरी, बोरदोलोई हे स्वतः बालपणापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित होते.

बोरदोलोई भाजपमध्ये सामील होणार?

प्रद्युत बोरदोलोई लवकरच भाजपमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यान बोरदोलोई किंवा आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते हिमंता शर्मा बिस्वा यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाहीये. त्यांच्या राजीनाम्याचे कारण गैरवर्तणुकीची एक घटना असल्याचे म्हटले जात आहे. वृत्तानुसार, राज्यातून दोन वेळा खासदार राहिलेले बोरदोलोई म्हणाले की, लहरीघाटचे विद्यमान काँग्रेस आमदार आसिफ नझर यांच्याशी संबंधित एका घटनेबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.

सूत्रांनुसार, बोरदोलोई यांनी लहरीघाटचे विद्यमान काँग्रेस आमदार आसिफ नझर यांची तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. आपल्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला आसिफ संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर हल्लेखोराला अटक देखील करण्यात आली होती. तरी बोरदोलोई यांनी आसामचे प्रभारी जितेंद्र सिंह यांना पत्र लिहून आपल्या अपमानाबद्दल आणि पक्ष नेतृत्वाने आपल्यावर अविश्वास दाखवल्याबद्दल तक्रार केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO WhatsApp Channel: WhatsApp वर करा एक क्लिक अन् मिळवा PF ची संपूर्ण माहिती; वाचा प्रोसेस

Maharashtra News Live Update: शिरूरच्या निमगाव भोगीत बिबट्याचा धुमाकूळ

Mumbai Metro : मेट्रोचा मोठा निर्णय! मुंबईत २० ऑक्टोबरपर्यंत रात्री उशीरापर्यंत मेट्रो धावणार, मुंबईकरांना दिलासा

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

SCROLL FOR NEXT