Archita Phukan Shares Brave Story of Escaping Dark Past Through Social Media Saam TV News
देश विदेश

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Archita Phukan Opens Up About Past: अर्चिता फुकन हिने वेश्याव्यवसायातून बाहेर पडत सोशल मीडियावर यश मिळवलं. केंड्रा लस्टसोबतचा फोटो शेअर करत तिच्या संघर्षमय आयुष्याची कबुली दिली आहे.

Bhagyashree Kamble

आजच्या काळात सोशल मीडियानं अनेक लोकांचे जीवन बदलून टाकलंय. या माध्यमाचे अनेक फायदे तसेच तोटे देखील आहेत. पोस्ट आणि रिल्समधून काही लोक रातोरात स्टार झाले आहेत. यापैकी एक नाव म्हणजे, आसाममधील सोशल मीडिया इन्फ्लूएंसर अर्चिता फुकन. अर्चिता फुकन सोशल मीडियावर बेबी डॉलच्या नावानंही प्रसिद्ध आहे. तिने अलिकडेच अमेरिकन पॉर्न स्टार केंड्रा लस्ट हिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर हा फोटो काही क्षणात व्हायरल झाला. मात्र, इन्फ्लुएंसर होण्यापूर्वी ती वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकली होती.

अर्चिता फुकनने २०२३ साली तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने सहा वर्षांपासून वेश्याव्यवसायात असल्याची माहिती दिली. तिने व्हिडिओ देखील शेअर केला होता. एका फोटोमध्ये ती खोलीत बसलेली दिसत आहे. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये तिने काळ्या रंगाचा शॉर्ट्स आणि टॉपसह डेनिम जॅकेट घातलं आहे.

या दोन्ही फोटोला तिनं कॅप्शन देखील दिलं आहे, 'सहा वर्षे भारतातील वेश्याव्यवसायाच्या अंधाऱ्या जगात अडकले होते. मी आता या अंधाऱ्या जगातील बंधनातून मुक्त झाले. मला यातून मुक्त होऊ दिले नाही. यासाठी मी २५ लाख मोजले', असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तिनं कॅप्शनमध्ये पुढे म्हटलं की, 'आज जेव्हा मी माझ्या भयानक भूतकाळाबाबत विचार करते, तेव्हा खंबीरपणे उभी राहते. मला जे यातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळालं, ते बळ प्रत्येक व्यक्तीकडे असतं. अंधारातून बाहेर पडण्यासाठी आपल्यामध्ये इच्छाशक्ती असायला हवी. माझा विश्वासू मित्र आणि संस्थेमुळे ८ मुली आणि महिलांची सुटका केली. त्यांना नवीन जीवन देण्यात यशस्वी झाले. याबद्दल मला आनंदच आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT