Ashwin Ramaswami Saam Digital
देश विदेश

Ashwin Ramaswami : 24 वर्षांच्या भारतीय तरुणाची अमेरिकेच्या राजकारणात एन्ट्री? कोण आहे जो बिडेन यांच्या पक्षातून निवडणूक लढवणारा अश्विन रामास्वामी?

Sandeep Gawade

Ashwin Ramaswami

अमेरिकेच्या राजकारणात भारतीय नागरिकांचा सहभाग अलीकडे वाढला आहे. कमला हॅरिससह, निकी हॅले, रामास्वामी यासारख्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी अमेरिकेच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला भारतीय तरुण २०२४ च्या अमेरिकन सिनेटच्या निवडणुकीच भाग घेत आहे. 24 वर्षीय अश्विन रामास्वामी जॉर्जियामध्ये स्टेट सिनेटरची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. जो बिडेन यांच्या डेमोक्रॅटक पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Gen Z मधून निवडणूक लढवणारा अश्विन हा पहिला भारतीय-अमेरिकन बनला आहे. Gen Z म्हणजे ज्यांचा जन्म 1997 ते 2012 दरम्यान झाला आहे. अश्विन रामास्वामी जॉर्जियाच्या जिल्हा 48 मधून सिनेटची निवडणूक लढवणार असून सध्या रिपब्लिकन पक्षाचे शॉन स्टिल जिल्हा 48 चे विद्यमान खासदार आहेत. शॉन स्टिलवरही जानेवारी २०२० मध्ये कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराचा आरोप आहे. या प्रकरणात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही आरोपी करण्यात आले आहे. जिल्हा 48 मध्ये जॉन्स क्रीक, सुवानी, अल्फारेटा, कमिंग, शुगर हिल आणि बुफोर्ड यांचा समावेश आहे.

रामास्वामी कुटुंब 1990 मध्ये अमेरिकेत स्थायिक

रामास्वामी यांचे आई-वडील 1990 मध्ये तामिळनाडूहून अमेरिकेत आले. 2021 मध्येच त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केला. संगणक शास्त्राबरोबरच त्यांनी कायद्याची पदवीही घेतली आहे. त्याचे आई-वडील दोघेही आयटी क्षेत्रातील आहेत. भारतीय संस्कृतीबरोबरच अमेरिकन संस्कृतीतही वाढले आहेत. भारतीय सांस्कृतिक तत्वज्ञानात खूप रस असल्याचंही त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर रामास्वामी यांनी सायबर सुरक्षेबाबत सरकारी एजन्सीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. स्टॅनफोर्डमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये काम केलं, परंतु सरकारमध्ये अधिक तंत्रज्ञानाची जाण असलेल्या लोकांची गरज आहे, म्हणून त्यांनी सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी (CISA) सुरू केली.

आपल्या समुदायाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी राज्य सिनेटची निवडणूक लढवत आहे. तरुणांनी कोणतीही पार्श्वभूमी न घेता राजकारणात यावं. प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. सर्व लोकांना नोकऱ्या, उद्योग तसेच आरोग्यसेवा आणि पुनरुत्पादकाचे अधिकार मिळावेत अशी आमची इच्छा आहे. सार्वजनिक सुरक्षा ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे. शाळेतील गोळीबारासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT