Voting for Congress President Saam TV
देश विदेश

Himachal Pradesh : एकीकडे भारत जोडो तर दुसरीकडे पक्ष छोडो; उमेदवारांची यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये बंडखोरी

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे -

Himachal Pradesh Election: हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, उमेदवारांची यादी जाहीर होताच कॉंग्रेसमध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस पक्ष सध्या केंद्रीय सत्तेपासून दूर आहे.

पक्ष वाढीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा (Congress President) निकाल देखील आज लागणार आहे. काँग्रेसकडून पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा या पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळालं आहे.

पाहा व्हिडीओ -

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, ही यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. कारण, कुल्लूच्या बंजार मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने आदित्य विक्रम सिंह (Vikram Singh) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

तर किन्नौरचे विद्यमान आमदार जगत सिंह नेगी यांचे नाव पहिल्या यादीत नाही. चंबाच्या भरमौर जागेसाठी अद्यापपर्यंत घोषणा करण्यात आलेले नाही. राज्यात युवक काँग्रेस आणि काही माजी आमदारांच्या विरोधानंतर पक्ष आता तिकिट वाटपानंतरही पुनर्विचार करताना दिसत आहे.

12 नोव्हेंबरला मतदान -

निवडणूक आयोगाकडून हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या 68 जागांसाठी निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत 8 जानेवारी 2023 ला संपत असून त्या अगोदर निवडणूका घेतल्या जाणार आहेत. हिमाचल मधील एकूण 68 जागांपैकी एससीसाठी 17 जागा आणि एसटीसाठी 3 जागा राखीव आहेत. तर हिमाचलमधील मतदान हे एकाच टप्प्यात घेतलं जाणार आहे. 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 8 डिसेंबरला निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT